
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेतर्फे मुंबई-नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे-नागपूर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. होळी सणानिमित्ताने मूळ गावी जाणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष गाडी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष या दोन्ही गाड्या ९, ११, १६ व १८ मार्चला चालविण्यात येणार आहे. दोन्ही गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे व दादर स्थानकावर थांबा राहणार आहे. (Central Railway)
(हेही वाचा – RBI माजी गव्हर्नर Shaktikanta Das यांना केंद्राकडून मोठी जबाबदारी; आता ‘या’ पदावर करणार काम)
पुणे-नागपूर विशेषगाडी ११ व १८ मार्चला आणि पुणे-नागपूर विशेष गाडी १२ व १९ मार्चला चालविण्यात येणार आहे. ही गाडी पुणे येथून ३.५० वाजता प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपुरात दाखल होईल. नागपूर-पुणे विशेष गाडी १२ व १९ मार्चला आणि नागपूर-पुणे विशेष गाडी १३ व २० मार्चला धावले. या गाड्यांना उरुली, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव व वर्धा स्थानकावर थांबा राहणार आहे. (Central Railway)
(हेही वाचा – मुंबई-नाशिक महामार्गावरील Kasara Ghat पुढील ६ दिवस दोन टप्प्यात राहणार बंद)
मुंबई (सीएसएमटी)-नागपूर सुपरफास्ट विशेष गाडी रविवार आणि मंगळवारी मुंबईहून रात्री ११.२० वाजता निघेल आणि नागपूरला दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. नागपूर-मुंबई (सीएसएमटी) सुपरफास्ट विशेष गाडी रविवार आणि मंगळवारी नागपूर येथून रात्री ८ वाजता निघेल आणि मुंबईला (सीएसएमटी) दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ही गाडी २४ डब्यांची राहणार आहेत. यामध्ये दोन ब्रेक व लगेज, चार सर्वसाधारण, चार शयनयान, एक एसी फर्स्ट क्लास, एक एसी फर्स्ट व सेकंड, दोन एसी सेकंड, १० थर्डी एसी, राहणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापुर, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबणार आहे. (Central Railway)
(हेही वाचा – देशाच्या विकासासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही ; Amit Shah यांचे प्रतिपादन)
पुणे-नागपूर सुपरफास्ट विशेष गाडी पुण्याहून मंगळवारी दुपारी ३.५० वाजता निघेल आणि नागपुरला दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. नागपूर-पुणे सुपरफास्ट विशेष गाडी नागपूरहून बुधवारी सकाळी ८ वाजता निघेल आणि पुण्याला रात्री ११.३० वाजता पोहोचेल. ही गाडी २० डब्यांची असणार आहे. या गाडीला उरूली, दौंडकॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबे आहेत. (Central Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community