Samruddhi Highway वरील प्रवाशांसाठी गुड न्यूज; ‘या’ २१ ठिकाणी मिळणार विशेष सुविधा 

166

देशातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती मार्ग (Expressway) असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर (Mumbai-Nagpur Samruddhi Highway) २१ ठिकाणी नव्याने सुविधांची उभारणी होणार आहे. ‘वे-साइड अॅमेनिटीज’ (Way-side amenities) म्हणून ओळख असलेल्या या सुविधांमध्ये आता अत्याधुनिक स्वच्छतागृहही असेल. (Samruddhi Highway) 

समृद्धी महामार्ग हा एकूण ७०१ किमी लांबीचा आहे. त्यातील ६२५ किमी लांबीचा मार्ग आत्तापर्यंत तीन टप्प्यांत वाहनचालकांसाठी सुरू झाला आहे. मात्र त्यावर थांबण्यासाठीच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे अखंड प्रवास केल्याने रस्ते संमोहन (Hypnosis) होऊन अपघाताच्या अनेक घर्टनाही घडल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) रस्त्यालगतच्या सुविधांची तयारी सुरू केली आहे.

(हेही वाचा – ‘…कर्जत जामखेडला न्याय द्या’; Rohit Pawar यांच्या मतदारसंघातील पोस्टरची चर्चा)

त्यामध्ये एकूण २० ठिकाणी (दोन्ही बाजूंना १०-१०) अशा सुविधा उभ्या होत आहेत. त्या ठिकाणी चार हेक्टरवर किमान ५० कोटी रुपये गुंतवून या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. तर किमान फूड कोर्ट, अर्थात खाण्या-पिण्याची सोय तातडीने करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यानंतर आता महामंडळाने २१ ठिकाणी स्वच्छतागृहे उभे करण्यासाठी निविदा काढली आहे. यामध्ये मुंबई ते नागपूर दिशेकडील दहा तर नागपूर ते मुंबई दिशेकडील ११ जागांचा समावेश आहे. एकूण २.१० कोटी रुपये त्यासाठी खर्च केले जाणार आहेत. तसेच कंत्राट मिळाल्यापासून १५ दिवसांत ही सुविधा संबंधित कंत्राटदाराला उभी करायची आहे.

(हेही वाचा –बांगलादेश सरकार हिंसाचारावर नियंत्रण आणणार ?; Operation Devil Hunt ला सुरुवात)

या ठिकाणी मिळणार सुविधा 

नागपूर दिशेकडील वायफळ (नागपूर), गुंदेवाडी व मानकापूर (वर्धा), दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), दवाळा (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) यांचा समावेश आहे. तर मुंबई दिशेने वायफळ (नागपूर), गणेशपूर (वर्धा), शिवनी (अमरावती), ताथोड अखतवाडा व दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), कडवांची (जालना), पोखरी व अनंतपूर (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) येथे अत्याधुनिक स्वच्छतागृहांची सुविधा निर्माण होणार आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.