मुंबईत घरं घेण्याचे स्वप्न पाहणा-यांसाठी सर्वात मोठा आधार म्हणजे म्हाडा. गेल्या तीन वर्षांत म्हाडाने मुंबईतल्या घरांसाठी लाॅटरी काढण्यासाठी म्हाडाने तयारी सुरु केली आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणाही केली जाईल.
पहाडी -गोरेगाव, अॅंटाॅप हिल, विक्रोळी आणि कोळे- कल्याण या ठिकाणी ही घरे असतील. बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करु नये, असा निर्णय म्हाडाने घेतला होता. मात्र, आता चालू प्रकल्पातील येत्या 6 महिन्यांत किंवा वर्षभरात बांधाकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल अशा घरांचा सोडतीत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा: राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; 24 तासांत दुस-यांदा बदलली तारीख )
जितेंद्र आव्हाडांनी केले होते ट्वीट
दिवाळीत मुंबईमध्ये सुमारे 4 हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. मुंबई मंडळाने सोडतीची तयारी सुरु केली असून, लकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या घरांच्या लाॅटरीसंदर्भात घोषणा केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी यासंर्भात एक ट्वीट केले होते. दिवाळीत 3 हजार घरांची सोडत निघेल, असे सांगितले होते.
Join Our WhatsApp Community