खुशखबर: रोजगारात भरमसाठ वाढ; अकुशल- कुशल कामांमध्ये 73 टक्के वाढ

148

वित्त वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत अकुशल कामगार आणि कुशल कामगार यांच्या रोजगारात 73 टक्के वाढ झाली आहे. रोजगारात महिलांचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर, बाजाराची स्थिती सुधारली आहे. मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढवण्याची गरज निर्माण झाल्याने मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. रोजगार वृद्धीत बीपीओ, कस्टमर केअर, घरपोच वितरण, डेटा इंट्री बॅक ऑफीस, फिल्ड सेल्स आणि किरकोळ काउंटर विक्री या क्षेत्रांची हिस्सेदारी सर्वाधीक आहे. या श्रेणींचा एकूण उपलब्ध रोजगारातील वाटा 80 टक्के आहे.

( हेही वाचा: मास्क सक्ती नाही; गर्दी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरा – राजेश टोपे )

रोजगारातील सर्वोच्च 5 शहरे

  • दिल्ली 15 टक्के
  • बंगळूर 14 टक्के
  • मुंबई 13टक्के
  • हैदराबाद 8 टक्के
  • पुणे 7 टक्के

कुठे वाढताहेत संधी

टिअर-2 आणि टिअर-3 शहरांत रोजगाराच्या अधिक संधी सातत्याने वाढताना दिसत आहेत. 57 टक्के रोजगार इच्छुक पदवीधर अथवा त्यापुढील शिक्षण घेतलेले आहेत. याचाच अर्थ अकुशल व कुशल कामगारांच्या बाबतीत शिक्षित मनुष्यबळ कंपन्यांना उपलब्ध आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.