महिला दिनी खुशखबर…आता घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात मिळणार सूट!

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जागतिक महिला दिनी अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे त्यांच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक उपाययोजना आणि तरतुदी केल्या आहेत.

८ मार्च महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच महिला दिनी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांना खूषखबर दिली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जागतिक महिला दिनी अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे त्यांच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक उपाययोजना आणि तरतुदी केल्या आहेत.

राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना

अजित पवार यांनी राज्यातील महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली आहे. ज्या महिलेमुळे घराला घरपण येते, त्या घरावर तिचे नाव असावे, ही माझ्या मायभगिनींची अपेक्षा अवाजवी नाही. महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रीयेचाच तो एक भाग आहे. राज्यातील तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना घोषित करण्यात आली आहे. कोणतेही कुटुंब यापुढे राज्यात घर विकत घेईल, तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावावर व्हावी व ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी बनावी, यासाठी प्रोत्साहन म्हणून १ एप्रिल २०२१ पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास, मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत देण्यात येईल. अशी घोषणा अजित पवार यांनी केली. महिलेच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या महसुलामध्ये १००० कोटींची तूट येण्याची शक्यता आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः आव्हानात्मक परिस्थिती असूनही महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प! मुख्यमंत्र्यांकडून कौतुक)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थीनी प्रवास सवलत योजना

मुलींच्या शिक्षणासाठी राज्याने अनेक प्रागतिक पावले उचलली आहेत. मुलींचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत केले आहे. आता मी राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यांतील विद्यार्थिंनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी, राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन देणारी राज्यव्यापी योजना जाहीर केली. या योजनेसाठी शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असे अजित पवार म्हणाले.

नवतेजस्विनी-  महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास

हा एकूण ५२२ कोटी ९८ लाख रुपये खर्चाचा प्रकल्प असून, हा प्रकल्प सहा वर्षांच्या कालावधीकरता राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटातील दहा लाख महिलांना उपजिव‍िकेसाठी साधने तर उपलब्ध होतीलच, शिवाय त्यांच्या व्यवसायामध्ये मूल्यवृध्दी देखील होईल.
महिला व बाल सशक्तीकरण योजना- महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ३ टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णयही आपण घेतला आहे. त्यातून प्रत्येक वर्षी किमान ३०० कोटी रुपये नियतव्यय उपलब्ध होईल.
महिला राज्य राखीव पोलिस गट- आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलिस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट स्थापन करण्याची  घोषणा करण्यात आली आहे.

(हेही वाचाः अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही, अजित दादा विरोधकांवर भडकले)

सन २०२१-२२ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महिला व बालविकास विभागास 2 हजार 247 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. केंद्राकडून प्राप्त होणारा १ हजार ३९८ कोटी ६६ लाख रुपये नियतव्यय विचारात घेता, या विभागासाठी एकूण ३ हजार ६३७ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना-

कोरोना काळातील टाळेबंदीचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला असला, तरी या काळात सर्वाधिक कुचंबणा झाली, ती असंघटित क्षेत्रातल्या कष्टकऱ्यांची. त्यातही घरकाम करणाऱ्या आमच्या मायभगिनींची दुरावस्था आणखी दुर्दैवी झाली. या मायभगिनी यापुढे अशा संकटांत मदतीपासून वंचित राहू नयेत, म्हणून त्यांची नोंदणी व त्यांना आधार ठरेल अशी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना जाहीर करण्यात आली. या महिलांच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी “समर्पित कल्याण निधी” निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी बीज भांडवल म्हणून आज मी २५० कोटी रुपये जाहीर करत आहे. जमा होणा-या एकूण निधीतून घरकाम करणा-या आमच्या मायभगिनींसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतील.
नवीन न्यायालयाची स्थापना- राज्यात महिला व बालकांवरील अत्याचाराचे खटले (POCSO) त्वरेने निकाली निघावेत यासाठी, १३८ विशेष जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. त्‍यासाठी १०३ कोटी ५० लाख रुपये खर्च होणार आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळास मान्यता देण्यात आली आहे.

(हेही वाचाः अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक! देवेंद्र फडणवीसांची टीका )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here