खुशखबर! मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव, धरणे भरली!

सध्या या सर्व धरण व तलावांमध्ये एकूण १२ लाख ६४ हजार ९९८ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख २६ हजार ४९९ कोटी लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे.

183

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणी साठा आता हळूहळू वाढत आहे. या सर्व तलाव आणि धरणांमध्ये मुंबईकरांच्या एकूण तहान असलेल्या पाण्याच्या तुलनेत ८७ टक्के एवढा साठा जमा झाला आहे. मुंबईकरांची एकूण तहान ही १ ऑक्टोबर रोजी असलेल्या पाण्याच्या एकूण साठ्यावर अवलंबून असते. त्यामुळे ३१ सप्टेंबरच्या पाण्याच्या साठ्याचा तुलनेत सध्याचा साठा हा पुरेसा असून धरणे पूर्ण भरल्यानंतर त्यातील पाणी वाहून घालवण्याऐवजी अशाप्रकारे १५ सप्टेंबरपर्यंत १० टक्के पाणी साठा कमी राहिल्यास त्यांचा फायदा मुंबईकरांना होवून पर्यायाने गावात सोडलेल्या पाण्यामुळे होणारा नदीला पूर येण्याचा धोकाही टाळता येवू शकतो.

चार तलावांतील पाणी साठ्याची स्थिती!

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे चार तलाव व धरण मागील महिन्यात भरुन वाहू लागली आहेत. तर मुंबईला सर्वाधिक पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्याची पातळी २१ ऑगस्ट रोजी वाढल्याने याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आजबाजूच्या नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा धरणामध्ये १४२ मीटर एवढी पाण्याची पातळी अपेक्षित आहे. सध्या त्यामध्ये १३८ मीटर एवढी पाण्याची पातळी झालेली आहे. तर अप्पर वैतरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे.

(हेही वाचा : बारामतीतल्या भावा-बहिणींच्या रक्षाबंधनाची सेंच्युरी)

एकूण १ लाख २६ हजार ४९९ कोटी लिटर एवढा पाणी साठा जमा

सध्या या सर्व धरण व तलावांमध्ये एकूण १२ लाख ६४ हजार ९९८ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख २६ हजार ४९९ कोटी लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. संपूर्ण मुंबईची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढी पाण्याची आवश्यकता असते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यासर्व तलाव व धरणांमध्ये कमी पाणी साठा असला तरी पावसाचा उरलेला कालावधी आणि तलावातील एकूण पाण्याच्या तुलनेत आवश्यक असणारा पाणी साठा याचा विचार केला तर तो पुरसा असल्याचे जलअभियंता विभागाचे म्हणणे आहे. जर मोठा पाऊस आला तर यातील पाणी सोडून द्यावे लागणार आहे. त्यातुलनेत या पाण्याचा वापर मुंबईकरांसाठी करता येवू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

मागील तीन वर्षांतील २३ ऑगस्टमधील पाणी साठ्याची आकडेवारी

  • सन २०२१ : १२ लाख ६४ हजार ९९८ (८७.४७ टक्के)
  • सन २०२० : १३ लाख ५६ हजार ७३२ (९३.७४ टक्के)
  • सन २०१९ : १३ लाख ८४ हजार ९५५ (९५.६९ टक्के)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.