गणेशोत्सवकाळातील (Ganeshotsav)१० दिवसांत मोनोरेलने (Monorail) प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद (Good response) मिळाला. या कालावधीत प्रवाशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. मोनोरेलला झालेला तोटा भरून काढण्यासाठी एमएमआरडीएकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.
मोनोरेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२३ अखेरीस तब्बल २४२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. संपूर्ण वर्षभरात प्रकल्पाला फक्त १३.४१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यानंतर आता मार्गिकेसाठी ५८० कोटी रुपयांच्या नवीन गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव होता. यामुळे मोनोरेलला पुन्हा चांगले दिवस येण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त एमएमआरडीएने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. याचा सकारात्मक परिणाम गणेशोत्सवकाळात दिसून आला.
(हेही वाचा – Monsoon Update : यावर्षी राज्यात झाला सरासरीच्या ९६ टक्के पाऊस )
किती प्रवाशांनी केला मोनोरेलचा वापर…
गणेशोत्सवकाळात १० दिवस ९ ते १८ सप्टेंबरदरम्यान एकूण प्रवासीसंख्या १ लाख ५८ हजार १९१ होती. या संख्येत २६ हजार ८८९ प्रवाशांची वाढ झाली. त्यामुळे मोनोरेलच्या प्रणालीत लक्षणीय सुधारणा (significant improvement monorail system) झाली. कामकाजातील बदलांमुळे मोनोरेल प्रणालीत मोठी सुधारणा झाली. सकारात्मक बदलांचा परिणाम गणेशोत्सवादरम्यान वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे दिसून आला. मोनेरेलची प्रवासीसंख्या वाढण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलली जात असल्याची माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (Metropolitan Commissioner of MMRDA Dr. Sanjay Mukherjee) यांनी दिली आहे.