दिलासादायक बातमी : दिवसभरात मुंबईत २,६६२ रुग्ण !

रुग्ण संख्या कमी झाल्याने सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या ९०३ वरून सोमवारी ८१४ एवढी झाली आहे, तर कंटेन्मेंट झालेल्या चाळी आणि झोपडपट्टीची संख्याही १०७ वरून ९३ एवढी झाली आहे.

मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा दिलासा देणारी बातमी आहे. सोमवारी, ३ एप्रिल रोजी दिवसभरात चक्क २,६६२ रुग्ण आढळून आले आहेत. तर ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून चार हजारांच्या आसपास असणारी रुग्ण संख्या आता तीन हजारांच्या आत पोहाचून २ हजार ६६२ रुग्ण आढळून आले. मात्र, रुग्णांची ही आकडेवारी कमी दिसून येत असली तरी सरासरी ४५ हजारांवर करण्यात येणाऱ्या कोविड चाचण्यांच्या तुलनेत सोमवारी २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांमधील चाचण्या आणि त्यामध्ये आढळून येणारी रुग्ण संख्या ही मुंबईकरांसाठी किती धोक्याची कि धोक्याच्या बाहेरची आहे स्पष्ट होईल.

(हेही वाचा : नेस्को कोविड केंद्रातील १ हजार ५०० नवीन रुग्णशय्यांचे लोकार्पण)

रुग्ण दुपटीचा दर १११ दिवसांवर आला!

रविवारी दिवसभरात जिथे ३,६७२ रुग्ण आढळून आले होते, त्या तुलनेत सोमवारी २,६६२ रुग्ण आढळून आले. तर सोमवारी दिवसभरात एकूण ५ हजार ७४६ रुग्ण बरे होवून घरी परतले. मात्र, सामेवारपर्यंत ५४ हजार १४३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु होते. तर दिवसभरात ७८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ५० रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. तर यामध्ये ५२ पुरुष व २६ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ५ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत. तर ५३ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. आणि ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा २० एवढा होता. मुंबईत रविवारी रुग्ण दुपटीचा दर १०३ दिवसांवर आला होता, तो वाढून सोमवारी १११ दिवसांवर आला आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या ९०३ वरून सोमवारी ८१४ एवढी झाली आहे, तर कंटेन्मेंट झालेल्या चाळी आणि झोपडपट्टीची संख्याही १०७ वरून ९३ एवढी झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here