आधीच देशात महागाई वाढली आहे. सर्वसामान्यांना महागाईची आता आणखी झळ पोहोचण्याची शक्यता आहे. कारण खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलांच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे एफएमसीजी कंपन्यांनी दरवाढ केली आहे. अशातच हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले या कंपन्यांनी मागील आठवड्यातच आपल्या प्रोडक्टच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. आता दुस-या कंपन्याही आपल्या खाद्यतेल्यांच्या वा इतर वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
पामतेलाच्या किमतीत होणार वाढ
या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहे. तसेच, उद्योग क्षेत्राकडून किमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पामतेलाचा भाव 180 रुपये प्रति लिटरवर गेल्याचं पार्ले प्रोडक्टचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयांक शाह यांनी सांगितले.
( हेही वाचा :एनसीसी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत मिळणार ‘हा’ लाभ! )
दरवाढीचा बोजा ग्राहकांवर
डाबर आणि पार्लेजी यासारख्या कंपन्यांचे सध्याच्या परिस्थितीवर बारीक लक्ष असून, ते महागाईच्या समस्येपासून लढण्यासाठी काही पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. एफएमसीजी कंपन्या महागाईचा बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले यांच्याकडे उच्च किंमत निश्चित करण्याची ताकद आहे. काॅफी आणि पॅकेजिंग वस्तूंच्या दरवाढीचा बोजा ते ग्राहकांवर टाकत आहेत, असे डाबर इंडियाच्या मुख्य वित्त अधिकारी अंकुश जैन यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community