Google Anti-Theft Feature : गुगलने अँड्रॉईड फोनसाठी आणलेले अँटी-थेफ्ट फिचर कसे काम करते?

Google Anti-Theft Feature : गुगलने तुमच्या अँड्रॉईड फोनच्या सुरक्षिततेसाठी आणली दोन नवीन फिचर्स.

31
Google Anti-Theft Feature : गुगलने अँड्रॉईड फोनसाठी आणलेले अँटी-थेफ्ट फिचर कसे काम करते?
  • ऋजुता लुकतुके

गुगल कंपनी आपल्या अँड्रॉईड फोनच्या सुरक्षिततेवर काम करत आहे. फोन चोरीला जाणं हे आर्थिक नुकसान आहेच शिवाय आपला महत्त्वाचा डेटाही त्यामुळे चोरीला जातो. तो धोका कधी कधी आर्थिक नुकसानीपेक्षा मोठा असतो. त्यामुळे गुगलने फोनच्या सुरक्षिततेवर सध्या लक्ष केंद्रीत केलं आहे. अँड्रॉईड फोनसाठी कंपनीने दोन नवीन फिचर आणली आहेत. यामध्ये तुमचा फोन चोरीला गेल्यावर तुम्ही थेफ्ट डिटेक्शन लॉक आणि ऑफलाईन डिव्हाईल लॉक हे दोन फिचर वापरू शकाल. (Google Anti-Theft Feature)

(हेही वाचा – Jaish-E-Mohammed चा एक गट सोशल मीडियावर कार्यरत; तरुणांना हेरून करतात दहशतवादी संघटनेत सामील)

‘थेफ्ट डिटेक्शन’ फिचरमध्ये मूळात तुमचा फोन चोरीला गेला आहे हे अँड्रॉईड फोनमधील कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोग्रामला कळतं. लगेचच तो तुमचा फोन बंद करून टाकतो. त्यामुळे चोराला फोन सुरू करता येत नाही. फोन चोरीला गेल्यावर साधारणपणे तो घेऊन लोक स्कूटर किंवा बसमध्ये तो घेऊन पळून जातात. अँड्रॉईड फोनमधील सेन्सर तसंच फोनमधील नवीन प्रोग्राम ही चाल लगेचच पकडू शकतो. फोन चोरीला गेलाय हे त्याला कळतं. तो फोन तर लॉक करतोच. शिवाय फोनच्या हालचाली पोलिस अधिक सक्षमपणे पकडू शकतात. (Google Anti-Theft Feature)

(हेही वाचा – Conversion : धर्मांतर आणि निकाह करण्याच्या दबावाला कंटाळून हिंदू तरुणीने केली आत्महत्या, मोहम्मद कासिवला अटक)

फोन चोरीला गेल्यावर तो आपोआप लॉक होत असल्यामुळे त्यातील महत्त्वाची माहिती आणि कुठलंही ॲप चोर सुरू करू शकत नाही. ऑफलाईन फोन लॉक हे आणखी एक फिचर आहे ज्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहू शकतो. चोराने फोनचा इंटरनेट बंद केला, तरीही हे फिचर तुमचा फोन बंद करून टाकेल. रिमोट लॉक हे फिचर पूर्वीपासूनच अँड्रॉईड फोनमध्ये होतं. आणि त्यामुळे फोन तुमच्यापासून दूर असेल तरीही फोन क्रमांक वापरून तुम्ही फोन दुरूनच लॉक करू शकता. कुठल्या अँड्रॉईड फोनवर या सुविधा मिळतील हे अजून स्पष्ट नाही. पण, अपडेटच्या स्वरुपात हे फिचर तुम्हाला मिळू शकतील. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या गुगल प्ले सर्व्हिसेसच्या अपडेटवर नीट लक्ष द्या. (Google Anti-Theft Feature)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.