अवघ्या काही तासांमध्ये आपण नवीन वर्ष २०२४मध्ये पदार्पण करणार आहोत. रविवार, ३१ डिसेंबर हा या वर्षाचा शेवटचा दिवस. गुगलनेही (GOOGLE-DOODLE) सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे.
गुगल डूडलद्वारे २०२३ या वर्षाचा निरोप घेत आहे. नववर्षानिमित्त गुगलने खास डूडल तयार केले आहे. गुगलने तयार केलेल्या या डूडलला ‘नवीन वर्षाची संध्याकाळ’, असे नाव दिले आहे. यामध्ये २०२३ आणि नवीन वर्ष २०२४ची एक छोटीशी झलक दिसेल, असे हे अॅनिमेशन आहे.
कोणत्याही विशेष प्रसंगी गुगल त्याचे डूडल तयार करते. नवीन वर्षात गुगलने तयार केलेले डूडल वैशिष्ट्यपूर्ण आहे. गुगल स्क्रीनवर सुरू केल्यास डूडल बदललेले दिसेल. गुगल डूडलद्वारे २०२३वर्षाचा निरोप घेत आहे. नवीन वर्ष २०२४साठी ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे. डूडल आकर्षक दिसण्याकरिता विविध रंगांनी सर्वात मोठी भूमिका बजावली आहे. या डिझाईनमध्ये प्रसंग, आनंद आणि उत्साह एकत्र दिसून येतो.
(हेही वाचा –आता युपीआय पेमेंट होणार अधिक सोपे )
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी छायाचित्रे
‘ओ’ अक्षराच्या जागी हसतमुख इमोजी लावण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण डूडलला सेलिब्रेटी लूक देण्यात आला आहे. नुसतं बघून असं वाटतं की, हा २०२३ वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. याशिवाय डूडलवर क्लिक केल्यानंतर पुढे गेलं की, वरच्या बाजूला नवीन वर्षाची सायंकाळ दिसते. नववर्षाचे स्वागत करणारी अनेक छायाचित्रे यामध्ये पाहायला मिळतात.
गुगल डूडल म्हणजे काय?
गुगल डूडल हे गुगलचे खास फिचर आहे. १९९८ मध्ये गुगलने पहिल्यांदा डूडल तयार केले होते. गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन यांनी डिझाईन केले होते. त्यांच्यानंतर गुगल प्रत्येक खास प्रसंग साजरा करण्यासाठी डूडल तयार करते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community