- ऋजुता लुकतुके
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी कंपनीचा एआय चॅटबॉट जेमिनीच्या काही चुका मान्य करत त्याने दिलेली काही उत्तरं ‘समस्या निर्माण करणारी’ आणि ‘लिंगभेद’ करणारी असल्याचं मान्य केलं आहे. अलीकडेच गुगलने जेमिनीच्या काही सेवाही थांबवल्या होत्या. या चॅटबॉटने तयार केलेल्या फोटोंवर जगभरात टीका झाली होती. (Google Gemini AI)
सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी या संदर्भात कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना मेमो लिहिला आहे. आणि यात त्यांनी चॅटबॉटची काही उत्तरं ही न ‘न स्वीकारता येण्यासारखी’ आणि ‘पूर्णपणे चुकीची’ असल्याचं म्हटलं होतं. ‘आपली चूक झालीय,’ असं त्यांनी या ई-मेलमध्ये कबूलच केलं आहे. (Google Gemini AI)
द व्हर्ज वृत्तपत्राने पिचाई (Sundar Pichai) यांचं हे पत्र छापलं आहे. आणि यात पिचाई म्हणतात, ‘जेमिनी ॲपने दिलेली काही फोटो आणि लिखित स्वरुपातील काही उत्तरं ही आक्षेपार्ह आणि काही ग्राहकांच्या भावना दुखावणारी आहेत. त्यात लिंगभेदही आहे. मला हे स्पष्ट करायचं आहे की, हे चालवून घेता येणार नाही. आणि आपल्याकडून चूक झालेली आहे.’ (Google Gemini AI)
Alphabet’s $GOOGL CEO Sundar Pichai sent a memo to employees calling the responses from Google’s Gemini AI “completely unacceptable.” (Full Memo attached)
“No Al is perfect, especially at this emerging stage of the industry’s development, but we know the bar is high for us and… pic.twitter.com/kGwFzoBEAp
— Wall St Engine (@wallstengine) February 28, 2024
(हेही वाचा – ICC Test Ranking : यशस्वी, जुरेल आणि शुभमनची आयसीसी कसोटी क्रमवारीत आगेकूच)
जेमिनीच्या कार्यप्रणालीत आवश्यक ते बदल करणार
कुठलीही एआय प्रणाली पूर्णपणे बिनचूक उत्तरं देत नाही. गुगलचंही जेमिनीवर काम सुरू आहे. पण, आपण आपल्यासाठी जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते वरचं आहे. आणि तिथे चुकांना जागा नाही, असंही पिचाई (Sundar Pichai) यांनी इथं म्हटलं आहे. (Google Gemini AI)
या मेमोबरोबरच जेमिनीच्या कार्यप्रणालीत आवश्यक ते बदल करण्यासाठीही पिचाई (Sundar Pichai) यांनी पावलं उचलली आहेत. संरचनेतील बदलांबरोबरच चॅटबॉटची मार्गदर्शक तत्त्वं, चॅटबॉटच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तांत्रिक बदल असे उपाय त्यांनी सुचवले आहेत. (Google Gemini AI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community