Google Map Feature ने नुकतीच नवीन वैशिष्ट्ये Launch केली आहेत. ज्यात अंदाजे टोल किंमत, रिअल टाइम ट्रॅफिक स्थिती यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व फीचर्सच्या लाॅन्चनंतर असे दिसते की, Google Maps हे केवळ एक नेव्हिगेशन अॅप नाही, जे यूजर्सना पाॅईंटपर्यंत पोहोचण्यास मदत करते. परंतु, ते त्याहून अधिक आहे. अॅपद्वारे ऑफर वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे आपण लोकेशन पिन करु शकता.
जर एखादे लोकेशन तुम्हाला एखादे लोकेशन माहित नसेल किंवा ते रस्त्याच्या नेटवर्कपासून दूर असेल तेव्हा हे फीचर काम करेल. ड्राॅपिंग पिन हे फीचर अॅंड्राॅइड, IOS आणि डेस्कस्टाॅप यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
असे पिन करा लोकेशन?
- लोकेशन पिन करण्यासाठी, तुम्ही Android, IOS आणि डेस्कस्टाॅपवर Google Maps वर जाऊन या स्टेप्स फाॅलो करा.
- सर्वात आधी Google Maps अॅप ओपन करा.
- आता लोकेशनवर लांब टॅप करा, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाल पिन दिसेल.
- आता तुम्हाला खाली निवडलेल्या स्थानासाठी अनेक पर्याय दिसतील.
- त्यानंतर तुम्ही Direction, Start वर टॅप करुन नेव्हिगेट करणे सुरु करु शकता.
- यूजर्सना Whatsapp सह सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर पिन लोकेशन Save आणि Share करण्याचा ऑप्शनदेखील दिला जात आहे.
- तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही लेबल ऑप्शनवर क्लिक करुन अॅपवर या पिनचे लोकेशन लेबल करु शकता.