Google Map ने चुकीचा रस्ता दाखवला आणि UPSC चे २० ते २५ विद्यार्थी परीक्षेपासून राहिले वंचित

67
Google Map ने चुकीचा रस्ता दाखवला आणि UPSC चे २० ते २५ विद्यार्थी परीक्षेपासून राहिले वंचित
Google Map ने चुकीचा रस्ता दाखवला आणि UPSC चे २० ते २५ विद्यार्थी परीक्षेपासून राहिले वंचित

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा आज देशभरात विविध ठिकाणी पार पडत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) परीक्षा असल्यामुळे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यातील विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरला परीक्षा देण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या सेंटरचा पत्ता गुगल मॅपवर (Google Map) शोधला आणि त्या ठिकाणी पोहोचले. पण तेथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आपण सेंटरवर न पोहोचता दुसरीकडेच आलो आहोत.

हेही वाचा-Mumbai Fire: गोरेगावच्या फर्निचर मार्केटला भीषण आग ; 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

यानंतर विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. काही वेळाने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. पण तो पर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. जवळपास २० ते २५ विद्यार्थ्यांना या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (Google Map)

हेही वाचा-republic day 2025 : प्रजासत्ताक दिनाला शुभेच्छा द्यायच्यात ना? मग वाचा republic day चे सर्वोत्तम quotes!

विद्यार्थ्यांचे पालक माध्यमांशी बोलताना म्हणाले, “आज आम्ही विवेकानंद कला, सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो. येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होती. आम्ही गुगल मॅपवर सर्च केलं आणि हा पत्ता टाकला. मात्र, या ठिकाणाहून हा पत्ता दुसरीकडे ११ किलोमीटरवर दाखवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला आणि त्यांना परीक्षा देता आली नाही.” (Google Map)

हेही वाचा-Guillain Barre Syndrome या दुर्मिळ आजाराचे निदान कसे होणार ? डॅाक्टर काय सांगतात ? वाचा सविस्तर …

“आज सकाळी ९ वाजता परीक्षेसाठी रिपोर्टींगची वेळ होती. त्यानंतर ९ वाजून ३० मिनिटांनी पेपर सुरू होणार होता. पण सकाळी ९ वाजून ५ मिनिटांच्या अंतरावर काही विद्यार्थी या ठिकाणी आले. पण तो पर्यंत उशीर झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना आतमध्ये परवानगी देण्यात आली नाही. नियमाप्रमाणे ९ वाजता गेट बंद झालं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी विनंती केली, आम्हाला चुकीचा पत्ता मिळाला. गुगल मॅपमुळे आम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचलो, त्यामुळे आम्हाला उशीर झाला. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही, परिक्षेला बसण्याची परवानगी मिळाली नाही. या गुगल मॅपच्या गोंधळामध्ये २० ते २५ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले.” असं पालक म्हणाले. (Google Map)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.