Google सर्चद्वारे बूक करता येणार रेल्वेचे तिकीट, काय आहे नवीन फीचर?

गुगल कडून युजर्सना नेहमीच नवीन फीचर्स देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आता असंच एक फीचर गुगलकडून देण्यात येणार आहे. या फीचरमुळे काही निवडक देशांतील युजर्सना केवळ गुगल सर्चद्वारे रेल्वेचं तिकीट खरेदी करण्यास परवानगी देण्यात येईल. त्यामुळे युजर्सना याचा खुप मोठा फायदा होणार आहे.

सध्या केवळ काही देशांमध्येच हे फीचर लाँच करण्यात येणार असून कंपनीने या फीचरचा जगभरात विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आगामी काळात हे फीचर जगभरातील सर्व देशांमध्ये लाँच करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

रेल्वे तिकीट खरेदीचा ऑप्शन

जर्मनी,स्पेन,इटली आणि जपानमधील युजर्सना आसपासच्या प्रवासासाठी थेट गुगल सर्चद्वारे रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी सोपा ऑप्शन देण्यात येणार आहे. आपल्या ट्रॅव्हल टूल्समध्ये सस्टेनिबिलीटीचा समावेश करण्यात आल्याचे गुगलकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः मोबाईल व इंटरनेट सेवा स्वस्त होण्याची शक्यता, टेलिकॉम नियमांत बदल होण्याची शक्यता)

असे करता येईल तिकीट बुकिंग

या फीचरमुळे युजर्सना केवळ सर्च रिझल्टमध्ये केवळ आपले सोर्स स्टेशन आणि डेस्टिनेशन स्टेशन टाकायचे आहे. त्यानंतर एक नवीन मोड्यूल दिसेल त्यामध्ये केवळ डिपार्चर डेट सिलेक्ट करुन उपलब्ध ऑप्शनची तुलना करता येईल. ट्रेन सिलेक्ट केल्यानंतर बुकिंग पूर्ण करण्यासाठी भागीदाराच्या वेबसाईटवर थेट लिंक दिली जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here