Google New Feature: आता फोन कॉल्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा, गुगल देणार लवकरच नवीन फिचर

गुगलच्या 127.0.620688474 या व्हर्जनमध्ये हे फीचर पहायला मिळालं आहे. सध्या केवळ जपानमधील यूजर्ससाठी रोलआउट करण्यात आलेलं आहे.

193
Will Google Charge For Searches? गुगल खरंच गुगल सर्चसाठी आपल्याकडून पैसे घेणार का?

फोन कॉल्सच्या माध्यमातून वाढत्या फसवणुकीला आता आळा बसणार आहे. देशभरात स्पॅम कॉल करून लोकांचे बँक खाते हॅक करणे, अनोळखी व्यक्तिने फोन करून वैयक्तिक माहिती विचारणे, अशा घटना सर्रास घडताना आढळतात. यासाठीच गुगलने आता एक नवीन पाऊल उचलले आहे. (Google New Feature)

आपल्या अँड्रॉईड फोनमध्येच अनोळखी नंबर ओळखणारं खास फिचर गुगल देणार आहे. यामुळे स्पॅम कॉल्सवर आळा बसायला मदत होईल. (Google New Feature:)

गुगलच्या या फीचरचं नाव ‘Lookup’ असं असणार आहे. यूजर्सना आपल्या फोनच्या सिस्टीममध्येच हे फीचर मिळेल. यामुळे यूजर्सना कोणतंही नवीन अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फीचर गुगलच्या ‘फोन’ अ‍ॅपमध्ये जोडण्यात येईल.

(हेही वाचा – Narendra Modi: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रालयात बदलणार अनेक नियम, जाणून घ्या काय आहे खास?)

कसं असेल नवीन फिचर? 
यूजर्सना कॉल लॉगमध्ये हे ‘लुकअप’ फीचर मिळेल. सध्या कॉल हिस्ट्रीमध्ये एखाद्या काँटॅक्टवर क्लिक केल्यास ‘व्हिडिओ कॉल’, ‘मेसेज’ आणि ‘हिस्ट्री’ असे तीन पर्याय मिळतात. तर अनोळखी नंबरवर क्लिक केल्यास व्हिडिओ कॉल ऐवजी ‘अ‍ॅड कॉन्टॅक्ट’ हा पर्याय मिळतो. नव्या अपडेटनंतर याठिकाणी आता ‘लुकअप’ हा चौथा पर्यायही पहायला मिळेल. यावर टॅप करून यूजर्स अनोळखी नंबरबद्दल माहिती मिळवू शकतील. गुगलच्या 127.0.620688474 या व्हर्जनमध्ये हे फीचर पहायला मिळालं आहे. हे फीचर सध्या केवळ जपानमधील यूजर्ससाठी रोलआउट करण्यात आलेलं आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये हे ग्लोबली लाँच होईल असं गुगलने स्पष्ट केलं. यामुळे आता यूजर्सना अननोन नंबर तपासण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज भासणार नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.