- ऋजुता लुकतुके
गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे. आणि त्यामुळे गुगलपेचा वापर आता फक्त देशांतर्गत नाही तर परदेशातही शक्य होणार आहे. तसं झालं तर फॉरेक्स कार्डांची गरजच उरणार नाही. (Google Pay)
We are pleased to announce a strategic partnership between NPCI International and Google Pay India, to expand the transformative impact of UPI to countries beyond India. @GooglePayIndia @dilipasbe #NPCIInternational #NIPL @upichalega #GooglePayIndia #GooglePay #NPCI #UPI pic.twitter.com/7doEs3kroi
— NPCI (@NPCI_NPCI) January 17, 2024
दोघांमधील सामंजस्य करारात तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत.
एक म्हणजे परदेश वारी करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी युपीआयचं माध्यम उपलब्ध करून देणं, भारता बाहेरही युपीआय किंवा त्यासारखी पेमेंट यंत्रणा उभी करायला मदत करणं आणि युपीआय माध्यम वापरून आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी यंत्रणा उभारणं. (Google Pay)
या करारामुळे युपीआयचा जागतिक वापर वाढेल, असं बोललं जात आहे. आणि खासकरून आंतरराष्ट्रीय व्यापारात याची मोठी मदत होणार आहे. कारण, आतापर्यंत अशा व्यवहारांमध्ये दोन्ही देशातील चलनं, त्यांचा विनिमय दर अशा गोष्टींचं भान ठेवावं लागत होतं. पण, आता प्रत्येक व्यक्ती आपल्या देशातील चलनातच व्यवहार करेल. आणि दुसऱ्या देशातील व्यक्तीला त्याच्या चलनात हे पैसे युपीआय माध्यमातून मिळू शकतील. (Google Pay)
(हेही वाचा – HDFC to Expand : एचडीएफसीला हवी सिंगापूरमध्ये शाखा उघडण्यासाठी परवानगी)
‘भारतातून परदेशवारी करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक व्यवहार सोपे होतील, ही एक गोष्ट. पण, त्याचबरोबर जागतिक स्तरावर भारताला युपीआय प्रणालीसाठी नवीन ओळख मिळेल. आणि डिजिटल व्यवहारांसाठी भारत आपलं तंत्रज्जान जगाबरोबर शेअर करणार आहे, असा हा अनोखा योग यातून साध्य होतो,’ असं एनपीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश शुक्ला मीडियाशी बोलताना म्हणाले. (Google Pay)
भारतात विकसित झालेली युपीआय प्रणाली यापूर्वीही जगभरात पोहोचली आहे. सिंगापूर, फ्रान्स, युएई आणि श्रीलंका या देशांनी त्यांच्या देशात अशी प्रणाली उभी करण्यासाठी भारताची मदत घेतली आहे. पण, गुगल पे बरोबरचा करार हा एक मोठा मापदंड ठरेल. (Google Pay)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community