- ऋजुता लुकतुके
गुगल कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आपलं मॉटेल जेमिनी कसं असेल याची झलक जगाला दाखवली आहे. (Google Unveils Gemini)
गुगलच्या अल्फाबेट या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जेमिनी जगासमोर आणली आहे. जेमिनीची थेट स्पर्धा ओपनएआयशी असेल. गुगलने अलीकडेच जेमिनी मॉडेलच्या निर्मितीसाठी आपल्या डीपमाईन्ड आणि गुगलब्रेन या दोन उपकंपन्याचं विलिनीकरण केलं होतं आणि या दोन कंपन्यांनी एकत्र येत जेमिनी विकसित केलं आहे. (Google Unveils Gemini)
जेमिनी मल्टीमोडल प्रकारची यंत्रणा आहे. म्हणजेच लिखित माहिती, कोड, ध्वनी, चित्र किंवा चलचित्र अशा कुठल्याही प्रकारच्या माहितीचं प्रोसेसिंग जेमिनी करू शकते आणि यातील कुठल्याही माध्यमात किंवा एकत्र माध्यमांत कामही करू शकते. (Google Unveils Gemini)
Introducing Gemini, Google’s largest and most capable AI model. 🧵 #GeminiAI https://t.co/T0tIw9HQyO
— Google (@Google) December 6, 2023
गुगलचं हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल तीन प्रकारच्या सेवा ग्राहकांना देईल. यात विशेष कौशल्यपूर्ण कामांसाठी जेमिनी अल्ट्रा, विविध प्रकारची काम एकत्रितपणे करण्यासाठी प्रो आणि उपकरणांमध्ये चालणारं नॅनो मॉडेल असं कामाचं विभाजन गुगलने त्यासाठी केलं आहे. (Google Unveils Gemini)
जेमिनीच्या उदयामुळे गुगल कंपनीत कृत्रिम बुद्धिमत्तेचं नवीन पर्व सुरू होत आहे, अशी प्रतिक्रिया अल्फाबेटचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी दिली आहे. (Google Unveils Gemini)
We believe in making AI helpful for everyone. That’s why we’re launching Gemini, our most capable model that’s inspired by the way people understand and interact with the world. #GeminiAI pic.twitter.com/gNG9ha9xMO
— Google (@Google) December 6, 2023
जेमिनी प्रोच्या ग्राहकांना गुगल एआय स्टुडिओ किंवा गुगल क्लाऊड व्हर्चेक्स या प्लॅटफॉर्मवर जेमिनी एपीआयच्या माध्यमातून हे तंत्रज्जान वापरता येईल. १३ डिसेंबरपासून जेमिनी प्रो उपलब्ध होणार आहे. (Google Unveils Gemini)
(हेही वाचा – Rahul Dravid on SA Tour : दक्षिण आफ्रिकेत काय असेल भारतीय खेळाडूंची रणनीती, सांगतायत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड)
तर मोबाईलवर उपलब्ध असलेलं जेमिनी नॅनो तंत्रज्ञान ६ डिसेंबरपासून गुगल पिक्सेल ८ या मोबाईल फोनवर मिळूही लागलं आहे. त्यासाठी अँड्रॉईड १४ यंत्रणा फोनमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्यात एआयकोअर असणं गरजेचं आहे. जेमिनीचं नॅनो मॉडेल पुढे सर्व प्रकारच्या अँड्रॉईड फोनसाठी उपलब्ध करून देण्याचा गुगलचा विचार आहे. (Google Unveils Gemini)
गुगलच्या सर्वच उत्पादनांमध्ये हळू हळू जेमिनी वापरण्यात येईल. (Google Unveils Gemini)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community