- ऋजुता लुकतुके
गुगल कंपनीची अशी अनेक उत्पादनं आहेत, ज्यामुळे लोकांचं जगणं फार सोपं झालंय. गुगलने आता नुकतंच ‘गुगल वॉलेट’ नावाचं नवं ॲप लॉन्च केलं आहे. अँड्रॉईड वापरकर्त्यांना हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. हे ॲप आल्यानंतर आता गुगल पे हे ॲप बंद होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गुगल वॉलेट हे नेमके काय आहे? हे जाणून घेऊ या… (Google Wallet)
यूजर्स गुगल वॉलेट हे ॲप डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड, गिफ्ट कार्ड स्टोअर करण्यासाठी वापरू शकतात. हे एक डिजिटल वॉलेट असून अँड्रॉईड वापरकर्त्यांना ते वापरता येणार आहे. गुगलने सांगितल्यानुसार या ॲपचा वापर वेगवेगळे कार्ड्स, चित्रपटाचे टिकट, बोर्डिंग पास, आयडी कार्ड साठवून ठेवण्यासाठी करता येईल. गुगल वॉलेट हे ॲप गुगल पे ॲपपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. गुगल पेचा पैशांचा वापर, बील देण्यासाठी करता येतो. गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल पे हे ॲप बंद होणार नाही. दुसरीकडे गुगल वॉलेट हे ॲप नॉन पेमेंट ॲप आहे. त्यामुळे गुगल पे वर त्याचा काहीही परिणाम पडणार नाही, असे गुगलने सांगितले आहे. (Google Wallet)
(हेही वाचा – CM Eknath Shinde यांनी मदत केल्याने पक्षांतर केले; रवींद्र वायकर यांचा खुलासा)
या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे डिजिटल डॉक्यूमेंट्स सुरक्षित ठेवता येणार आहेत. भारतात लॉन्च होण्यापूर्वी गुगलने एकूण २० ब्रँड्सशी करार केला आहे. यामध्ये पीव्हीआर, आयनॉक्स, एअर इंडिया, इंडिगो, फ्लिपकार्ट, पाईन लॅब्स, कोच्ची मेट्रो या ब्रँड्सचा समावेश आहे. गुगल वॉलेटमुळे चित्रपट पाहणे, प्रवास, गिफ्ट कार्ड्स यांचा वापर सोपा होणार आहे. गुगल पे हे ॲप भारतासह एकूण ७९ देशात वापरले जाते. याआधी गुगल पेला अँड्रॉईड पे म्हणून ओळखले जायचे. गुगल पेच्या मदतीने तुम्ही कोणतेही बील देऊ शकता. कोणालाही पैसे पाठवू शकता. (Google Wallet)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community