- ऋजुता लुकतुके
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील स्पर्धाही आता वाढत चालली आहे. आणि त्यामुळे चॅटजीपीटीने घिबली ॲनिमेटेड स्टुडिओचा पर्याय ग्राहकांना दिल्यावर गुगलनेही तातडीने आपला जेमिनी २.५ प्रो (Google Gemini 2.5 Pro) बाजारात आणला आहे. सध्या हा प्रोग्राम प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. आणि त्यातल्या सुधारणाही अजून सुरू आहेत. पूर्णपणे व्हॉईस कमांडवर चालणारं हे व्हॉईस मॉडेल आहे. आण याला इंग्रजी व्यतिरिक्त इतरही काही भाषा समजतात. जेमिनीच्या वेबसाईटवर गेलात तर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून तुम्हाला २.५ प्रो हा पर्याय निवडावा लागेल. सध्या तरी जेमिनीच्या ग्राहकांसाठी ही सुविधा मोफत असणार आहे.
अँड्रॉईड आणि आयफोन वापरणाऱ्यांना सध्या २.५ प्रो (Google Gemini 2.5 Pro) वापरता येणार नाही. पण, त्यावरही गुगलचं काम सुरू आहे. लवकरच ही प्रणाली मोबाईल फोनसाठीही उपलब्ध करून देण्यात येईल. या महिन्याच चॅटजीपीटीने जपानमधील ॲनिमेशन स्टुडिओ घिबलीची मदत घेऊन लोकांना काही क्षणात त्यांचा ॲनिमेटेड फोटो देण्याची सुविधा दिली. त्यातूनच जगभरात घिबली ट्रेंड सुरू झाला आहे. घिबलीने बनवलेले फोटो लोक सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
(हेही वाचा Pakistan मध्ये धर्मांध मुश्ताकने केली हिंदू स्वच्छता कर्मचाऱ्याची हत्या)
अशावेळी गुगलनेही आपला २.५ प्रो (Google Gemini 2.5 Pro) ही प्रणाली पूर्वनियोजित प्रकाशनाच्या आधीच बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सध्या ही प्रणाली मोफतही असणार आहे. जेमिनी २.५ प्रो हे तर्कसंगत विचार करू शकतं. ओपन एआयचं ०३ मिनी आणि डीपसेकच्या आरआय प्रमाणे ते काम करेल. माणसाची कामगिरी आणि अचूकता सुधारण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
जेमिनी २.५ प्रो (Google Gemini 2.5 Pro) ही प्रणाली तर्क सुसंगत विचार करू शकते. त्यामुळे कोडिंग आणि तर्काशी संबंधित कामांत ते माणसाला मदत करू शकेल. ओपन एआय आणि क्लाऊड या कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मुसंडी मारल्यानंतर गुगल कंपनी यात मागे पडली आहे. पण, त्यानंतर गुगलनेही आपलं सगळं लक्ष कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोग्राम तयार करण्यावर केंद्रीत केलं आहे. कंपनीच्या जेमिनी वेबसाईटवर २.५ प्रो प्रणालीचा एक डेमो देण्यात आला आहे. आणि यात फक्त एका वाक्यातील कमांडवर या प्रणालीने अख्खा व्हीडिओ गेम बनवून दिल्याचं दिसत आहे.
शिवाय २.५ प्रो (Google Gemini 2.5 Pro) प्रणाली काही क्षणांतच ७,५०,००० शब्द विविध भाषांमध्ये भाषांतरित करू शकेल. ही क्षमता सध्या उपलब्ध असलेल्या प्रणालींमध्ये सर्वोत्तम आहे. ओपन एआयचा oआय मिनी २,००,००० इतके शब्द या वेळेत भाषांतरित करू शकतो. एकूणच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आता इथून पुढे स्पर्धा आणखी तीव्र होत जाणार आहे.
Join Our WhatsApp Community