कांदिवली पश्चिम येथील महावीर नगरमधील पंचशील उद्यान अर्थात गोपीनाथ मुंडे उद्यान आता कात टाकणार असून या उद्यानाचे नुतनीकरण तसेच सुशोभिकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे.
इतके रुपये खर्च केले जाणार
कांदिवली महावीर नगर येथील गोपीनाथ मुंडे उद्यानाच्या विकासासाठी तत्कालिन नगरसेविका शैलजा गिरकर यांनी प्रयत्न केले होते. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी निवडून आलेल्या भाजपच्या प्रतिभा गिरकर यांनी पुढे पाठपुरावा केल्यानंतर अखेर या उद्यानाच्या विकासाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. महापालिकेने या उद्यानाच्या विकासासाठी मागवलेल्या निविदेमध्ये १२ कंपन्यांनी भाग घेतला होता. महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा ३३ टक्के कमी बोली लावणाऱ्या मावल कंस्ट्रक्शन या कंपनीची निवड झाली आहे. या उद्यानाच्या विकासासाठी १ कोटी ६७ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
या कामांचा आहे समावेश
उद्यानाच्या विकासकामामध्ये सुरक्षा चौकीची दुरुस्ती, संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीचे काम, त्यावर जाळ्या बसवणे, पदपथांची सुधारणा व सौंदर्यीकरण, खुली व्यायामशाळा, मुलांना खेळाच्या जागेची निर्मिती करणे, गझेबो पुरवणे, सजावटीचे दिवे, बसायची आसने आणि हिरवळीच्या कामांचा समावेश आहे.
(हेही वाचा : ‘जंक फूड’ने लहान मुलांच्या दातांचे आरोग्य धोक्यात )
Join Our WhatsApp Community