gorakhnath mandir attack : यू ट्यूबवरून बनला धर्मांध! उच्च शिक्षण घेऊनही अतिरेकी विचारांना पडला बळी

131

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील प्रसिद्ध गोरक्षनाथ मंदिरात रविवारी, ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता घडलेल्या एका घटनेने सगळ्यांची झोप उडवली आहे. याठिकाणी मंदिराच्या गेटमधून एक मुसलमान तरुण वेगाने धावत येऊन सुरक्षेसाठी तैनात असलेला जवान गोपाळच्या हातातून शस्त्र हिसकावून घेऊ लागला. सुरक्षा जवानाला काही कळायच्या आत त्या तरुणाने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला सुरू केला. जवानावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या अहमद मुर्तझा अब्बासी बद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातील एक म्हणजे अहमद हे युट्युब पाहून धर्मांध बनला आहे.

कोण आहे अहमद मुर्तजा अब्बासी?

अहमद मुर्तजा अब्बासी यांच्याशी संबंधित अनेक माहिती समोर आली आहे. आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी हा गोरखपूरच्या सिव्हिल लाइन भागातील रहिवासी आहे. मुर्तझा अब्बासी याचे वडील मोहम्मद मुनीर हे अनेक वित्त कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार होते. अहमद मुर्तझा अब्बासी यांनी २०१५ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. २०१५ मध्ये इंजिनिअरिंगमधून उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आणि नंतर एस्सार पेट्रोकेमिकल्समध्ये नोकरी केली. त्याचे लग्न झालेले असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अहमद मुर्तझा अब्बासी याच्यावर अनेक डॉक्टरांनी उपचार केले असून तो मुंबईत राहत होता. मुर्तझा अब्बासी याच्यावर अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून अहमद मुर्तझा अब्बासी याच्या मित्रांच्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या. आरोपी मुर्तझा अब्बासीचे पहिले लग्न ठरवाताना चर्चेदरम्यान मोडले होते. अब्बासी याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले मात्र तिनेही सोडचिठ्ठी दिली. दरम्यान मुर्तझा अब्बासी याने केलेल्या गोरखपूर येथील हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहे.

(हेही वाचा नरसंहारानंतरही खोरे न सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांवर 30 वर्षांनी झाला हल्ला)

हे आहेत सुशिक्षित जिहादी 

  • हैदराबादचा तालमीजुर रहमान हा अमेरिकेतील कॉलिन महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करत होता, तो घरी परतला आणि 2014 मध्ये मुंबईहून इस्तंबूलला गेला आणि ISIS मध्ये सामील झाला.
  • रांचीचा सय्यद मुहम्मद अर्शियान हैदर याने अलीगड मुस्लिम विद्यापीठात शिक्षण घेतले, तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियंता आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, सय्यदने इस्लामिक स्टेटची आत्मघाती ड्रोन यंत्रणा विकसित करण्यात मदत केली होती.
  • फयाज वाडा नावाचा श्रीनगरचा रहिवासी ब्रिस्बेनमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर इस्लामिक स्टेटमध्ये सामील झाला. फयाजची नियुक्ती ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या हमदी अलकुदसी याने केल्याचा आरोप आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, पकडण्यात आलेल्या किंवा समुपदेशन करण्यात आलेल्या एकूण लोकांपैकी सुमारे 70 टक्के लोक मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गातील होते, तर 23 टक्के उच्चशिक्षित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.