Goregaon fire : मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत जाहीर केली मदत

110
Goregaon fire : मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत जाहीर केली मदत

मुंबईत गोरेगावमधील (Goregaon fire) इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत ८ जणांचा होरपळून मृत्यू  झाला आहे, तर ४३ जण जखमी झाले आहेत. ३० जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. या आगीत तळमजल्यावरील (Goregaon fire) काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील मिळत आहे.  दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.

ग्राउंड प्लस ७ मजल्याची ही इमारत (Goregaon fire) आहे. १५ वर्षापूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. यात ६३ कुटुंबे रहात होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या ३० पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे, तर ४३ जण या आगीमध्ये (Goregaon fire) जखमी झाले आहेत. ही आग लेवल २ प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. ही आग पहाटे साडे सहाच्या दरम्यान आटोक्यात आली. जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

(हेही वाचा – kurla Fire : कुर्ल्यातील इमारतीला मध्यरात्री भीषण आग, 39 रहिवासी जखमी)

अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर (Goregaon fire) शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेवर सरकार आणि महापालिका पूर्ण लक्ष ठेऊन असल्याचं देखील सांगितलं आहे. मुख्यमंत्री सध्या दिल्लीमध्ये असून त्यांनी तिथून या घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत तर जखमींच्या उपचारांचा संपुर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे सांगितले आहे.

आगीत जखमी झालेल्यांची नावं पुढीलप्रमाणे –

New Project 2023 10 06T115000.567

New Project 2023 10 06T115053.796

New Project 2023 10 06T115150.245

New Project 2023 10 06T115258.907

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.