गोरेगाव उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीतील आगीत जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर येथे भेट घेऊन विचारपूस केली. तसेच या दुर्घटनेची चौकशी केली जाईल. एसआरएच्या सर्व इमारतींचे ऑडीट होणार त्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, तसेच असे ही मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. ( Goregaon Fire)
या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांची यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडणार नाही, अशा प्रकराच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. तर इमारत कोणाचीही असो यापुढे महानगरपालिकेचा एक अधिकारी त्याचे ऑडिट करण्यात येईल. तसेच एसआरएच्या सर्व इमारतींचे आता ऑडिट करण्यात येईल. तर यासंदर्भात पुढील चौकशी देखील करण्यात येत आहे. ( Goregaon Fire)
(हेही वाचा : Election Commission : खरा राष्ट्रवादी पक्ष आमचाच; दोन्ही गटाचा निवडणूक आयोगापुढे जोरदार युक्तीवाद)
जखमी झालेल्यांवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. दरम्यान गोरेगावात इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. स्क्रॅपमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे. जखमींचा उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे .
हेही पहा –