गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प (Goregaon Mulund Link Road) अंतर्गत हाती घेतलेल्या कामांमध्ये जलवाहिन्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकल्पाचे काम निश्चित करताना या रस्त्याच्या खालून जाणाऱ्या जलवाहिनी तसेच मलनि:सारण वाहिन्यांची माहिती घेण्यात न आल्याने आता या वाहिन्याच अन्य जागी स्थलांतरीत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च तब्बल ४५ कोटी रुपयांनी वाढवला गेला आहे. (Goregaon Mulund Link Road)
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (Goregaon Mulund Link Road) अंतर्गत रत्नागिरी हॉटेल चौक, गोरेगाव येथे प्रस्तावित सहा पदरी उड्डाणपुल, मुलुंड खिंडीपाडा येथे उच्चस्तरीय चक्रीय उन्नत मार्ग आणि डॉ. हेडगेवार चौक, मुलूंड येथे सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेच्यावतीने बांधकामाच्या आराखड्यासह बांधकाम करण्याकरिता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. या कामांसाठी एस पी सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करून या कंपनीला २९ जानेवारी २०२२ रोजी कार्यादेश देण्यात आला. हे काम कार्यादेश दिल्यापासून ३६ महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामांसाठी ६६६ कोटी रुपयांच्या खर्च करण्यास मान्यता मिळाली होती. परंतु आता खर्च सुमारे ४५ कोटी रुपयांनी वाढून हे कंत्राट काम ७१३.१८ कोटी रुपये एवढे होणार आहे. (Goregaon Mulund Link Road)
(हेही वाचा – Dadar DSilva Road : फेरीवाल्यांनी डिसिल्व्हा रोड अडवला, वरळी, प्रभादेवीकरांनी घरी कसे जायचे?)
अंतर्गत भूमिगत सेवा वळवण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद
या प्रकल्प रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी प्रत्यक्षात सर्वेक्षण आणि खोदकाम करताना हाती घेतल्यांनतर वेगवेगळ्या व्यासाच्या भूमिगत पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या व मलवाहिनी आढळून आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत भूमिगत सेवा वळवण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद प्रकल्प खर्चामध्ये करण्यात आली होती, परंतु आता सर्वेक्षण आणि खोदकामानंतर आढळून आलेल्या भूमिगत सेवांचे जाळे वळवण्यासाठी २५.६८ कोटी रुपये अधिकचा खर्च येणार आहे. त्यामुळे हा एकूण खर्च ४५.६८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (Goregaon Mulund Link Road)
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १९९१ च्या विकास नियोजनाच्या आराखडयाप्रमाणे १५-३० मीटर रुंदीचा रस्ता अस्तित्त्वात होता. त्यानुसार भूमिगत सेवांचे जाळे टाकण्यात आले होते. परंतु २०३४ च्या विकास आराखड्याप्रमाणे रस्त्याचे ४५.७० मी. रुंदीकरण करण्यात आले आहे. व भूमिगत सेवा या रस्त्याखालून जात आहे अशी खूण नसल्यामुळे त्याच्या जमिनीमधील योग्य स्थानाची खात्री पटवता आली नाही, परिणामी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतर या रस्त्याखालून मलवाहिनी व जलवाहिनी जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्याखालून तसेच पुलांखालून जाणाऱ्या मलवाहिन्या तसेच जलवाहिनी स्थलांतरीत करावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Goregaon Mulund Link Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community