Goregaon SV Road : गोरेगावमधील एस व्ही रोडच्या रुंदीकरणातील १४ बांधकामांचा अडथळा झाला दूर

2217
Goregaon SV Road : गोरेगावमधील एस व्ही रोडच्या रुंदीकरणातील १४ बांधकामांचा अडथळा झाला दूर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

स्‍वामी विवेकानंद अर्थात एस व्ही रोड मार्गाच्या रूंदीकरणात अडथळा ठरणारी गोरेगाव पश्चिम येथील १४ बांधकामे सोमवारी ६ जानेवारी २०२५ रोजी पाडण्यात आली. महानगरपालिकेच्‍या पुनर्वसन धोरणानुसार, या बाधितांना आर्थिक मोबदला प्रदान करण्यात आला तथा पर्यायी पुनर्वसन करण्‍यात आले आहे. या निष्‍कासन कार्यवाहीमुळे स्‍वामी विवेकानंद मार्ग रूंदीकरण मोहीमेला अधिक गती मिळणार आहे. त्‍यात आशीष इमारत, अनंत निवास, अदानी इलेक्ट्रिसिटीचे वीज उपकेंद्र यांचा समावेश आहे. (Goregaon SV Road)

New Project 23 1

(हेही वाचा – वीर सावरकर यांचा अवमान केल्याप्रकरणी Rahul Gandhi न्यायालयात हजर राहणार की त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघणार?)

पी दक्षिण विभागात गोरेगाव पश्चिम येथे स्‍वामी विवेकानंद मार्गाचे रूंदीकरण करण्यात येत आहे. परंतु, या ठिकाणी सन १९६० पूर्वीपासूनची बांधकामे अस्तित्‍वात आहेत. त्‍यामुळे एकूण २७.४५ मीटर (९० फूट) रूंदीपैकी केवळ १२ मीटर रूंद रस्‍ता वाहतुकीस उपलब्‍ध होता. अरूंद रस्‍त्‍यामुळे या मार्गावर सकाळ आणि सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असे. महानगरपालिकेच्या रस्‍ता रूंदीकरण धोरणांतर्गत पी दक्षिण विभागाने या १४ बांधकामांना यापूर्वीच पाडकामासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यानुसार सोमवारी पी दक्षिण विभागाच्‍या पथकाने ही १४ बांधकामे हटवत सुमारे ५०० मीटरचा रस्‍ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्‍यात आशीष इमारत, अनंत निवास, अदानी इलेक्ट्रिसिटीचे वीज उपकेंद्र यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्‍या पुनर्वसन धोरणानुसार, बाधितांना आर्थिक मोबदला देण्यात आला आहे/पर्यायी पुनर्वसन करण्‍यात आले आहे. (Goregaon SV Road)

New Project 22 1

(हेही वाचा – म्हाडा वसाहतीतील पुनर्विकसित इमारतींना ओसी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी; MHADA ने आणली विशेष अभय योजना)

सहआयुक्‍त (परिमंडळ ४) विश्‍वास शंकरवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्‍त संजय जाधव यांच्‍या नेतृत्‍वाखाली ही कारवाई करण्‍यात आली आहे. या रस्ता रूंदीकरण कार्यवाहीमुळे गोरेगाव पश्चिम येथील स्‍वामी विवेकानंद मार्गावरील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. (Goregaon SV Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.