दिल्लीतील Maharashtra Sadan चा कारभार आता सुधारणार ?; मिळाले निवासी आयुक्त

61

नवीन महाराष्ट्र सदनातील (Maharashtra Sadan) प्रशासकीय कारभारातील त्रुटी, सोयी-सुविधा पुरवण्यात होणारे दुर्लक्ष, भोजनाच्या सुविधेपासून पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेपर्यंत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. सदनात येणाऱ्या पाहुण्यांना योग्य सुविधा पुरवल्या जात नसल्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही दखल घेतली होती.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघात बेबनाव? स्टार यष्टीरक्षक गंभीरवर चिडला?)

या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापन पहाण्यासाठी नव्या निवासी आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार, १९ फेब्रुवारी या दिवशी निवासी आयुक्तपदी विमला आर या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सलग तीन महिने हे पद रिक्त होते. त्यामुळे नवीन महाराष्ट्र सदनाच्या कारभाराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका केली जात होती.

गेल्या डिसेंबरपासून पद होते रिकामे

सध्या विमला आर (Vimala R) यांच्याकडे समर्ग शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी आहे. त्यांची मंगळवारी राज्याच्या सामान्य प्रशासन मंत्रालयाकडून दिल्लीतील (Delhi) महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिवपदी नियुक्ती केली गेली. तत्कालीन निवासी आयुक्त रुपिंदर सिंह यांची केंद्रीय गृहमंत्रालयात अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद गेल्या डिसेंबरपासून रिक्त होते. त्यामुळे नवीन महाराष्ट्र सदनाच्या (Maharashtra Sadan) प्रशासनाची जबाबदारी अतिरिक्त निवासी आयुक्त नीवा जैन यांच्याकडे देण्यात आली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.