देशात कुठेही मिळणार उपचार, आधारप्रमाणे झटपट काढा ‘हेल्थ कार्ड’! सरकारच्या ‘आभा’ उपक्रमाविषयी जाणून घ्या…

158

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडियाची सुरूवात झाली आहे. याचा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल आभा हेल्थ कार्ड ( Abha Health Card) हा उपक्रम सुरू केला आहे. सरकारच्या आरोग्यदायी क्रांतीच्या नव्या पर्वाची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे झाली आहे. आता ‘आभा’ या डिजिटल हेल्थ कार्डच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

( हेही वाचा : राजधानी एक्स्प्रेसच्या जेवणात आढळले झुरळ! सोशल मिडियावर फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया!)

आभा हेल्थ कार्डमुळे देशभरातील सर्व रूग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी हे कार्ड बनवत आहे. हेल्थ कार्डमुळे उपचारासाठी लागणाऱ्या कागदी जुन्या चिठ्ठ्या, रुग्णांचे कागदपत्र यांची आवश्यकता भासणार नाही तसेच कार्यप्रणाली अधिक जलद गतीने होऊन वेळेची बचत होणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये अनेकदा उपचार घेण्यासाठी गर्दी होते परंतु आता आभा कार्डामुळे उपचार घेण्यासाठी रांगेत बराच वेळ उभे रहावे लागणार नाही.

या हेल्थ कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून महात्मा फुले जनआरोग्य अभियानाद्वारे ही नोंदणी करण्यात येणार आहे.

या कार्डसाठी नागरिकांना कुठे नोंदणी करावी यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे…

नोंदणी प्रक्रिया कशी करतात ?

  • यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम healthid.ndhm.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • यानंतर क्रिएट अकाऊंट या पर्याय निवडा.
  • हेल्थ कार्ड नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करा.
  • नाव, पत्ता, फोन नंबर माहिती भरल्यावर तुम्हाला ओटीपी येईल.
  • १४ अंकी डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाईन अर्ज भरा, अशाप्रकारे तुम्ही डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

यासाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड, मोबाईल नंबर, जन्म प्रमाणपत्र ही कागदपत्रं आवश्यक आहेत. या कार्डाद्वारे रुग्णाच्या आरोग्याच्या संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीने डॉक्टर संपूर्ण आरोग्याच्या नोंदी, रुग्णाचे आधीचे आजार याची माहिती घेऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.