SBI ग्राहकांना सरकारचा इशारा, ‘हा’ मेसेज त्वरीत डिलीट करा; अन्यथा…

82

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI आपल्या ग्राहकांच्या हिताचा विचार करून नेहमीच त्यांना सतर्क करत असते. ग्राहकांना वेळोवेळी होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांसंदर्भात बँक सावध करत असते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना एका मेसेजबाबत सरकारने सतर्क केले आहे. सरकारी एजन्सी पीआयबीने एक एडवाइजरी जारी केली आहे. काही ग्राहकांना त्यांचे बँक अकाऊंट ब्लॉक केले जाईल, असा मेसेज येत आहे. अशा येणाऱ्या मेसेजना आणि कॉल्सना उत्तर देऊ नये, असे सरकारने म्हटले आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना अशा मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असा मेसेज आल्यास तो मेसेज त्वरीत डिलीट करण्यास सांगितले आहे.

सरकारने बँकेच्या ग्राहकांना केले सतर्क

यासंदर्भात पीआयबीने एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियाने बँक खातं ब्लॉक केले जाईल, असा मेसेज फेक आहे. शेअर केलेल्या ट्विटमध्ये अशा बनावट मेसेजचा फोटो देखील शेअर केला आहे. सरकारने बँकेच्या ग्राहकांना सतर्क केले आहे. यावेळी त्यांनी असे म्हटले की, खासगी अथवा बँकिंग माहिती शेअर कऱण्यास सांगणाऱ्या ई-मेल आणि मेसेजला उत्तर देऊ नये, जर तुम्हाला अशा प्रकारचे मेसेज आल्यास तो त्वरीत डिलीट करावा. तसेच report. phishing@sbi.co.in वर रिपोर्ट करा.

काय म्हटले फेक मेसेजमध्ये…

पीआयबीने ट्विट केलेल्या ट्विटमध्ये ग्राहकांना येणाऱ्या या बनावट मेसेजची माहिती दिली आहे. यामध्ये असे म्हटले की,‘प्रिय ग्राहक, तुमचे SBI BANK डॉक्यूमेंट एक्सपायर झाले आहेत. तुमचं अकाउंट ब्लॉक होईल. अकाउंट सुरू करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा, https://sbikvs.ll.’ दरम्यान, ही लिंक बनावट आहे. याआधी देखील एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.