Pimpri-Chinchwad पोलीस आयुक्तालयासाठी १५ एकर जागेच्या भूसंपादनास शासनाची मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे तातडीने निर्णय

49
Pimpri-Chinchwad पोलीस आयुक्तालयासाठी १५ एकर जागेच्या भूसंपादनास शासनाची मान्यता
  • प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलीस आयुक्तालयाच्या मजबुतीसाठी वाकड येथे १५ एकर जागेच्या भूसंपादनास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या विशेष पुढाकारामुळे हा निर्णय तातडीने घेण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी निर्गमित करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील वाढते औद्योगिकीकरण, स्थलांतरीत लोकसंख्येमुळे वाढलेला ताण आणि वाढती गुन्हेगारी यामुळे पोलिस यंत्रणेच्या सक्षमीकरणाची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २ सह, इतर अनुषंगिक कार्यालये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी वाकड येथे १५ एकर जागा भूसंपादन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Accident : पेडर रोड येथील व्यावसायिकाचा प्रभादेवी येथे मृत्यू; अपघात की घातपात?)

या प्रस्तावानुसार, वाकड येथील सर्व्हे नंबर २०८ आणि २०९ मधील ही जागा वाणिज्यिक दराने अधिमूल्य रकमेचा भरणा करून भूसंपादित करण्यात येणार आहे. या जागेवर पोलिस विभागासाठी आवश्यक असलेल्या इमारती, कार्यालये आणि निवास व्यवस्था उभारली जाणार आहे.

या निर्णयामुळे पोलीस दलाला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांना बळ मिळेल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज निवास सुविधा उभारण्यात येणार असल्याने त्यांच्यावरचा ताण कमी होईल. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराच्या सर्वांगीण विकासात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी सातत्याने मोलाची भूमिका बजावली असून या निर्णयामुळे शहराच्या सुरक्षिततेला बळकटी मिळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.