CNG-PNG च्या दरांत घट होण्याची शक्यता, केंद्र सरकारचा निर्णय

वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त असताना आता सर्वसामांन्यांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारकडून लवकरच सीएनजी आणि पीएनजी गॅसचे दर कमी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी घट होणार असल्याचे बोलले जात आहे.

सीएनजी-पीएनजीच्या दरांत होऊ शकते घसरण

गेल्या अनेक काळापासून सातत्याने सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ होत आहे. त्यामुळे सीएनजी वाहन चालक आणि घरगुती पीएनजी गॅस कनेक्शन असलेल्या उपभोक्त्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. त्यामुळेच केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूच्या एकूण निर्मितीपैकी काही वाटा इंडस्ट्री किंवा उद्योगांपासून शहरी गॅस वितरण कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात सीएनजी आणि पीएनजीचे दर हे घसरू शकतात.

(हेही वाचाः मोबाईल,ब्लूटूथ आणि लॅपटॉपच्या चार्जरबाबत मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, असा होणार फायदा)

गॅसच्या आरक्षित वाट्यात वाढ

तसेच पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी गॅस वितरण कंपन्यांना घरगुती स्तरावरील गॅससाठीच्या आरक्षित वाट्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मुंबईतील महानगर गॅस लिमिटेड सारख्या शहरी गॅस वितरक कंपन्यांसाठीचा राखीव वाटा 1.75 कोटी घनमीटर प्रतिदिन वरुन वाढवत 2.78 कोटी घनमीटर इतका करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here