हिवाळी अधिवेशनाला रेल्वेने जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार गैरसोय?

171

हिवाळी अधिवेशनाला यंदा १९ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाला बरेच सरकारी कर्मचारी नागपूरला रवाना होतात. नागपूरला जाण्यासाठी रेल्वे मार्गाने जाणे सर्वाधिक सोयीचे ठरते. सद्यस्थितीत नागपूरला सेवाग्राम, दुरांतो, विदर्भ एक्स्प्रेस आदी गाड्या जातात. परंतु विदर्भ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.

( हेही वाचा : पेन्शन धारकांना SBI बॅंकेने दिले मोठे गिफ्ट! घरबसल्या होईल ‘हे’ काम, बॅंकेतही जायची गरज नाही )

विदर्भ एक्स्प्रेला पॅन्ट्री कार नाही 

विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पॅन्ट्री कार अभावी चांगलीच गैरसोय होते. या गाडीला जेवणासाठी पॅन्ट्री कार नाही. रेल्वे अंतर्गत जेवणासाठी अनेक सुविधा सुरू करणाऱ्यात आल्या आहेत परंतु IRCTC च्या App वर या सर्व सेवा केवळ नाशिक पर्यंत उपलब्ध असतात. प्रवाशांना पहाटे गाडीत चहा-कॉफीचीही सुविधा नाही त्यामुळे अनेक प्रवाशांना पॅन्ट्री कार नाही म्हणून नाराजी व्यक्त केली.

New Project 2 13

जेवणाअभावी गैरसोय 

दरम्यान आता १९ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू असल्याने बरेच सरकारी कर्मचारी विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरला रवाना होणार आहेत. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांची जवळपास १४ तासांच्या प्रवासात पॅन्ट्री कार अभावी गैरसोय होणार हे स्पष्ट आहे. १२१०५ विदर्भ एक्स्प्रेस मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सायंकाळी १९.०५ वाजता सुटते आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी पहाटे ०८.५५ ला पोहोचते.

विदर्भ एक्स्प्रेसची संरचना 

विदर्भ एक्सप्रेसमध्ये 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी, 2 वातानुकूलित 2 टियर, 1 वातानुकूलित,वातानुकूलित 3 टियर (AB 1), 10 स्लीपर क्लास आणि 4 सामान्य अनारक्षित डबे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.