२००५ नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता त्यांना नवी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु या नव्या पेन्शन योजनेत अनेक दोष कर्मचारी संघटनांना आढळले आहेत. या नव्या पेन्शन योजनेला सुरूवातीपासूनच कर्मचारी वर्गाकडून विरोध करण्यात येत होता. अहमदनगरच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालया समोर एनपीएस हटावची घोषणा देऊन जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संपाचा इशारा शासनाला दिला आहे.
( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी प्रवाशांची होणार गैरसोय; पहा मेगाब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक!)
जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी संघटनांनी NPS ( new pension scheme) हटाव सप्ताह आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
२१ सप्टेंबर रोजी सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. मात्र आतापर्यंत सौम्य पद्धतीने आंदोलन केले असून आता २१ नोव्हेंबर २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘NPS हटाव सप्ताह’ कर्मचारी संघटनेच्या वतीने राबवले जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेमध्ये असलेल्या दोषाबाबत जागरूक करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालखंडात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत विचार केला जाऊ शकतो अशी सांगितले जात आहे.