शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय मालमत्ता, कार्यालये, वाहने यांचा वापर करून सोशल मीडियावर दबंग, सिंगम स्टाईलच्या रील्स आणि व्हिडिओ तयार करणे, तसेच सरकारविरोधात पोस्ट करणे हे आता महागात पडणार आहे. यापुढे अशा बेशिस्त वर्तनाला मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.
( हेही वाचा : परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांनी पाश्चात्य देशांना सुनावले खडेबोल)
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाढत्या सोशल मीडिया (Social Media ) वापराच्या पार्श्वभूमीवर भाजपा (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, सध्या काही शासकीय कर्मचारी सोशल मीडियावर सरकारविरोधी पोस्ट करताना दिसत आहेत. काहीजण तर थेट सरकारविरोधी संघटनांचे सदस्य असल्याचे समोर आले आहे.
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ तयार होताना सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता, त्यामुळे त्या नियमांमध्ये समाजमाध्यमांबाबत कोणताही उल्लेख नाही. मात्र बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा (Social Media ) वाढता प्रभाव पाहता, आता या नियमांमध्ये स्पष्ट बदल करण्याची गरज आहे.”
यासंदर्भात पुढील तीन महिन्यांत नवे नियम तयार करून शासन निर्णय जारी केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर केवळ जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत फडणवीस म्हणाले, “जम्मू-कश्मीर (Jammu & Kashmir), गुजरात (Gujarat) तसेच लाल बहादूर शास्त्री अकादमी यांनी तयार केलेल्या नियमांचा अभ्यास करून महाराष्ट्रही आपल्या सेवाशर्तींमध्ये सुधारणा करणार आहे.”
या नव्या मार्गदर्शक तत्त्वांत शासकीय कर्मचाऱ्यांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी करता येतील याचे स्पष्ट निर्देश असतील. यासंदर्भात कुणाकडे काही सूचना असतील, तर पुढील एका महिन्यात सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. येत्या तीन महिन्यांत हे नियम लागू होताच शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर (Social media) शिस्तबद्ध वागणे बंधनकारक होणार असून कोणताही अनुशासनभंग झाल्यास कारवाईही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community