BMC 6th & 7th Pay Commission : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या इतर संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची केली निराशा

महापालिकेच्या अभियंत्यांबरोबर इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देण्याचा मुहूर्त साधता आलेला नाही.

255
BMC 6th & 7th Pay Commission : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या इतर संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची केली निराशा
BMC 6th & 7th Pay Commission : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या इतर संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची केली निराशा

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात झा समितीने दिलेल्या वेतन विसंगती समितीचा अहवालातील शिफारशी केवळ अभियंत्यांसाठी लागू करण्यात आल्या. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अभियंता दिनी याची अधिकृत घोषणा सर्वच संवर्गासाठी याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली जाईल अशी असे बोलले जात होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी, महापालिकेतील सर्व संवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची निराशाच केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणांत, मागील वर्षी दिलेल्या वचनाची पूर्तता करत महानगरपालिका अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविला आहे आणि लवकरच थकबाकी सुद्धा देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करत एकप्रकारे महापालिकेच्या इतर संवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची घोर निराश केली.

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे रवींद्र नाट्य मंदिर येथे राष्ट्रीय अभियंता दिन सोहळा शुक्रवारी १५ सप्टेंबर २०२३ सायंकाळी संपन्न झाला, याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा करताना महापालिकेच्या अभियंत्यांबरोबर इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देण्याचा मुहूर्त साधता आलेला नाही. याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, वंदे भारत रेल्वे संकल्पनेचे निर्माते सुधांशू मणी, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चौरे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुंबईकरांचे जीवन सुखकर झाले पाहिजे, मुंबईकरांना उत्कृष्ट नागरी सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, याकडे शासनाचा कटाक्ष आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत गत वर्षभरात एक लाख कोटींहून अधिक रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात महानगरपालिका अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, अशा शब्दात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांचा गौरव केला. अभियंत्यांनी कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याकडे अधिक लक्ष द्यावे, मुंबईकरांना दर्जेदार सुविधा द्याव्यात. अभियंत्यांच्या प्रयत्नांना शासन देखील पूर्ण पाठिंबा देईल, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – PM Narendra Modi : चित्ता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सरकारकडून सुरुवात)

आज अभियंता दिन आहे, त्याचबरोबर वचनपूर्तीचाही दिन आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्याचे वचन दिले होते, ते आता पूर्ण केले आहे, असे खासदार राहुल शेवाळे यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले. उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले की, अभियंत्यांचे मुंबईसाठी योगदान मोठे आहे, याचा सर्वांनी आवर्जून उल्लेख केला. विविध पातळीच्या अकारण चौकशीच्या फेऱ्यांमधून अभियंता वर्गाला दिलासा मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी मनोगतातून केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते “मी अभियंता” या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. महानगरपालिकेच्या विविध अभियंत्यांच्या लेखणीतून उतरलेले कथा, कविता प्रवासवर्णन, स्फुट लेखन आदी साहित्य या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.