LPG Subsidy: केंद्र सरकारचे सर्वसामान्यांना गिफ्ट; एलपीजी सिलेंडवर सबसिडी जाहीर

115

केंद्र सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर २०० रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान १४.२ किलोच्या १२ एलपीजी सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर २०० रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे १.६ कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.

केंद्राच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत वर्षभरात १२ गॅस सिलिंडर दिले जातात. सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार, उज्ज्वला योजनेच्या ९.५९ कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी मिळणार आहे. या योजनेमध्ये सरकारकडून वर्षभरात १२ सिलिंडर देण्यात येतात. उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर २०० रुपयांच्या अनुदान मिळते म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना २४०० रुपयांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, १ मार्च २०२३ पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे ९.५९ कोटी लाभार्थी आहेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी एकूण ६,१०० कोटी रुपये आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ७,६८० कोटी रुपये खर्च होणार आहे. हा बोजा केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अनेक कारणांमुळे एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्याचे केंद्र सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अशा परिस्थितीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना यापासून संरक्षण देणे गरजेचे आहे. यासाठीच हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

(हेही वाचा – पालकांनो लक्ष द्या! स्कूल बसच्या शुल्कात १५ ते २० टक्क्यांनी वाढ, १ एप्रिलपासून होणार…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.