Fellowship Examination : बारटी, सारथी आणि महाज्योतीच्या फेलोशिपसाठी सरकारने दिली 2019 चीच प्रश्नपत्रिका

Fellowship Examination : 2019 साली जी प्रश्नपत्रिका देण्यात आली, तीच विद्यार्थ्यांना पुन्हा सोडवण्यासाठी देण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे. या प्रश्नपत्रिकेत अगदी प्रश्नांचा क्रमसुद्धा 2019 च्या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच होता.

170
Fellowship Examination : बारटी, सारथी आणि महाज्योतीच्या फेलोशिपसाठी सरकारने दिली 2019 चीच प्रश्नपत्रिका
Fellowship Examination : बारटी, सारथी आणि महाज्योतीच्या फेलोशिपसाठी सरकारने दिली 2019 चीच प्रश्नपत्रिका

छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवार, 24 डिसेंबर रोजी राज्य सरकारने बार्टी (Barti), सारथी (Sarthi) आणि महाज्योती (Mahajyoti) या फेलोशिपसाठी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्यभरात ही परीक्षा झाली; मात्र या परीक्षेत सरकारी भोंगळ कारभार पुढे आला आहे. 2023 चा हा पेपर 2019 च्या सेट पेपरप्रमाणे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. (Fellowship Examination)

(हेही वाचा – Parle Mahotsav 2023 : पार्ले महोत्सवाने व्यासपीठ दिल्याने अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू, कलाकार घडले; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार)

प्रश्नांचा क्रमही सारखाच

2019 साली जी प्रश्नपत्रिका देण्यात आली, तीच विद्यार्थ्यांना पुन्हा सोडवण्यासाठी देण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे. या प्रश्नपत्रिकेत अगदी प्रश्नांचा क्रमसुद्धा 2019 च्या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच होता. 2019 मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, तोच पेपर 2023 च्या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे, त्यांना या परीक्षेत पूर्णपैकी पूर्ण गुणही मिळू शकतात.

पेपर फोडलेल्या पाकिटात आल्याचा आरोप

सारथी, महाज्योती आणि बार्टीच्या फेलोशिपसाठी जो पेपर घेण्यात आला, तो पेपर फुटल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केला आहे. हा पेपर आधीच फुटलेल्या पाकिटात आला होता. तसेच त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या नाहीत. हा पेपर आधीच फोडला होता, असाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. या सर्व प्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (Fellowship Examination)

फेलोशिप मिळविण्यासाठी परीक्षा

महाज्योती (Mahajyoti), सारथी (Sarthi), बार्टी (Barti) यांच्यासाठीचा पीएचडी करण्याकरिता फेलोशिप मिळविण्यासाठी ही परीक्षा होती. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), कोल्हापूर (Kolhapur), नागपूर (Nagpur) आणि पुणे (Pune) या विभागाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली. हा पेपर सारथीच्या 1329, महाज्योतीच्या 1383 आणि बार्टीच्या 761 अश्या एकूण 3473 पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 200 जागांसाठी दिला.

(हेही वाचा – Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी ३५ तासांनंतर सुटली, पोलिसांच्या प्रयत्नांना यश)

या वेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचे पहायला मिळाले. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (Fellowship Examination)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.