न्याायालयाच्या दणक्यानंतर परिचारिकांनी बेमुदत आंदोलनाचा गुंडाळला गाशा

167

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने बदलीविरोधात बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाची घोषणा केली होती. या आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवेच्या कामकाजावर मोठे आव्हान उभे राहिले होते. याप्रकरणी बदलीविरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांची बाजू न्यायालयात मान्य न झाल्याने अखेर परिचारिकांनी बेमुदत आंदोलन तूर्तास पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. याप्रकरणी माहिती घेण्यासाठी मनिषा शिंदे यांना संपर्क केला असता वकिलांकडे बैठक सुरु असल्याने तपशीलवार नंतर माहिती दिली जाईल असे सांगण्यात आले.

नेमके प्रकरण काय?

सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिकांना शिकवण्याचे अतिरिक्त काम पाहणा-या मनिषा शिंदे यांच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांनी अधिष्ठात्यांकडे तक्रार केली होती. ही तक्रार निरर्थक असल्याचा दावा शिंदे यांनी केला असून, स्थानिक समितीने आपल्याबाजूने अहवाल दिल्याचे सांगितले. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलानलय तसेच अजून एका समितीने अहवाल सादर केला असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही अहवालानंतर गेल्या आठवड्याच्या शेवटी मनिषा शिंदे यांची नागपूर येथे बदली करण्याचे पत्र जाहीर करण्यात आले. बदली नियमबाह्य असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. तब्बल १०० ज्येष्ठ परिचारिका बदलीसाठी पात्र असताना त्यांना डावलून आपली बदली नियमबाह्य आहे, असा मुद्दा शिंदे यांनी उपस्थित केला. बदलीविरोधात शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याचे जाहीर करत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने ३० नोव्हेंबरपासून सरकारी रुग्णालयात बेमुदत आंदोलन जाहीर केले. सोलापूर येथील अधिसेविकेकडून त्रास दिला जात असल्याने परिचारिका संघटनेकडून दोन महिन्यांपूर्वीच आंदोलनाची नोटीस आपण वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाला दिल्याचा दावाही शिंदे यांनी केला.

( हेही वाचा: आजपासून सरकारी रुग्णालयात परिचारिकांचा संप ? जाणून घ्या सरकारी रुग्णालयातील परिस्थिती )

२६ नोव्हेंबरला दिले संपाबाबतचे निवेदन 

२८ नोव्हेंबरने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने ३० नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जात असल्याची कल्पना चार दिवसांपूर्वी दिली. सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याचे सांगण्याकरता किमान महिनाभर अगोदर नोटीस देणे बंधनकारक असताना नोटीस देण्याची तारीख २६ नोव्हेंबर असल्याचे परिपत्रकातून स्पष्ट झाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.