लॉकडाऊन नंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. जे विद्यार्थी, सरकारी हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या १ हजार ९२० जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. १२ मे २०२२ पासून आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in वर जाऊन इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२२ आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्याते प्रस्तावित करण्यात आले आहे.
( हेही वाचा : महिला प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय! )
अर्ज करण्यासाठी नियम व अटी
- पदसंख्या – १ हजार ९२० जागा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १२ मे २०२२
- अर्ज करण्याची तारीख – १३ जून २०२२
- अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
- शैक्षणिक पात्रता – दहावी पास
- शुल्क – १०० रुपये
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि आवश्यक तपशील भरून सबमिट करावे लागेल. Registration झाल्यावर लॉगिन करून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता.
Join Our WhatsApp Community