महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) पदांच्या एकूण १६९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२२ आहे.
( हेही वाचा : BEST@75 : बेस्टची पंचाहत्तरी; 7 ऑगस्टला साजरा होणार ‘अमृतमहोत्सवी बेस्ट दिन’)
नियम व अटी
- परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2021.
- पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी).
- पद संख्या – 1695 जागा.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.
- अर्ज शुल्क –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-
माजी सैनिक – रु.44/- - अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज भरणे सुरु झाल्याची तारीख – 30 जून 2022
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022
- अधिकृत वेबसाइट – mpsc.gov.in
- हे अर्ज केवळ आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारले जातील.
- अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in/candidate संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.