Government Law Jobs : लॉ केलंय आणि हवीय सरकारी नोकरी? मग हा लेख आहे तुमच्यासाठी…

127
Government Law Jobs : लॉ केलंय आणि हवीय सरकारी नोकरी? मग हा लेख आहे तुमच्यासाठी...
Government Law Jobs : लॉ केलंय आणि हवीय सरकारी नोकरी? मग हा लेख आहे तुमच्यासाठी...

वकिलीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं असा प्रश्न बर्‍याचदा पडतो. कोर्टाच्या बाहेर अनेक वकील आपल्याला दिसतात. छोट्या मोठ्या केस मिळवण्यासाठी जीवाचं रान करत असतात. पण कुणाची नोटरी करुन दे, कोर्ट स्टॅम्प विक, अशी पाळी त्यांच्यावर येते. पण लॉ केल्यानंतर सरकारी नोकरीची (Government Law Jobs) चांगली संधी उपलब्ध असते. आवश्यकता आहे, तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची…

सरकारी क्षेत्रात कायदा पदवीधर, पात्र वकिल आणि एलएलबी उमेदवारांसाठी मोठ्या संख्येने कायद्याच्या नोकऱ्या असतात. ही पदे जिल्हा न्यायालये, उच्च न्यायालये, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि कायदा आणि न्याय मंत्रालयासह विविध विभागांमध्ये मिळू शकतात. म्हणून, जर तुम्हाला कायद्याची आवड असेल आणि तुम्हाला कायदेशीर व्यवस्थेत योगदान द्यायचे असेल, तर या संधीचा लाभ घ्या!

चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या सरकारी नोकर्‍या उपलब्ध असतात आणि त्यासाठी शिक्षनाची अट काय असते?

(हेही वाचा – Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना निवडणुक आयोगाची नोटीस!)

वकील (ऍडव्होकेट):

भारतातील विविध उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालयांमध्ये वकिलांसाठी पदे रिक्त असतात. तुम्ही या न्यायालयांमध्ये सरकारी नोकरीसाठी (Government Law Jobs) अर्ज करु शकता. जर तुम्ही पात्र ठरलात तर वकील म्हणून चांगली नोकरी करता येईल.

प्रशासकीय अधिकारी (कायदेशीर):

भारतीय विमा आयुक्त कार्यालय (OICL) मध्ये कायदेशीर पार्श्वभूमी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी रिक्त पदे असतात. नोकरीची ही सुद्धा एक चांगली संधी आहे.

ऑफिसर ग्रेड ए (कायदेशीर):

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कायदेशीर सहाय्यक आणि कायदा अधिकारी नियुक्त करतात. सन्मान असलेल्या नोकर्‍यांपैकी एक नोकरी मानली जाते आणि पगारही चांगला मिळतो. तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) कायदेशीर अधिकारी नियुक्त करतात.

(हेही वाचा – Expiry date उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीसोबत घडलं असं काही!)

सहाय्यक / लिपिक:

उच्च न्यायालय सहाय्यक आणि लिपिक पदांसाठी भरती निघत असते. या नोकरीतही चांगली कारकीर्द घडू शकते.

ऑफिसर ग्रेड ए (सहाय्यक व्यवस्थापक):

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये कायदेशीर पार्श्वभूमी असलेल्या सहाय्यक व्यवस्थापकांची पदे सध्य रिक्त आहेत. असा अनेक संस्थांसाठी सहाय्यक व्यवस्थापकांची आवश्यकता असते.

उपसंचालक/कायदा:

सध्या जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) मध्ये या पदासाठी भरती सुरु आहे. त्याचबरोबर विविध सरकारी कार्यालयांमध्ये देखील उपसंचालकांची मागणी असते.

(हेही वाचा – D. K. Shivakumar: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल)

कायदा अधिकारी MMGS-III:

वाचकहो तेलंगणा राज्य विद्युत नियामक आयोग (TSERC) कायदा अधिकाऱ्यांची भरती करत आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर आत्ताच अर्ज करा.

त्याचबरोबर, कायदेशीर अनुपालन अधिकारी, अभियोक्ता, लीगल एड ऍटॉर्निस, लॉ क्लर्क, डेप्युटी डिरेक्टर (कायदा) अशा अनेक पदांसाठी तुम्ही अर्ज करु शकता.

कायद्याच्या नोकरीसाठी लागणारी पात्रता:
कायद्यातील बॅचलर पदवी (BL)
Legum Baccalaureus किंवा LLB (बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ)
कायद्यातील पदव्युत्तर पदवी (M.L.)
बारावीनंतर – बीए एलएलबी, बीबीए एलएलबी

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.