१८ हजार पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; नियमांमध्ये महत्त्वाचे बदल!

85

राज्यातील अनेक तरूण-तरूणी गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. या पोलीस भरतीबाबत नवी अपडेट समोर आली आहे. राज्यातील १८ हजार पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळ झाला असून या भरतीला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. गेल्या आठवड्यात प्रशासकीय कारण देत पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोजगार मेळाव्यात आठवड्याभरात पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरूवात होईल असे सांगितले होते. यानंतर आता बुधवार ९ नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

( हेही वाचा : Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी; परीक्षेविना होणार निवड, येथे करा अर्ज)

भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल

पोलीस भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या नव्या बदलांनुसार उमेदवारांना प्रथम शारीरिक चाचणी (Ground Exam) परीक्षा पास करावी लागेल. मैदानी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. याआधी लेखी त्यानंतर मैदानी चाचणी घेतली जायची. यंदाच्या भरतीला मात्र पहिले प्राधान्य मैदानी चाचणीला देण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झाली, अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयामुळे एक संधी मिळणार आहे. 2020 आणि 21 या वर्षात रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून हे उमेदवार पात्र असतील. शुक्रवारी गृहविभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.