Aadhaar Card : आधार देशात सर्वाधिक विश्वसनीय डिजिटल ओळखपत्र

153
Aadhaar Card : आधार देशात सर्वाधिक विश्वसनीय डिजिटल ओळखपत्र
Aadhaar Card : आधार देशात सर्वाधिक विश्वसनीय डिजिटल ओळखपत्र

भारत सरकारने जागतिक रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचा अहवाल नाकारला आहे आणि आधार कार्डला जगातील सर्वात विश्वसनीय डिजिटल ओळखपत्र म्हणून वर्णन केले आहे. मूडीज इन्व्हेस्टर्सने २१ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अहवालात आधारशी संबंधित लोकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली होती.

मनरेगा योजनेचा संदर्भ देत अहवालात म्हटले आहे की, भारतातील उष्ण आणि दमट हवामानात आधारच्या बायोमेट्रिक प्रणालीवर विश्वास ठेवता येणार नाही. कधीकधी ते योग्यरित्या कार्य करत नाही. त्यामुळे कामगारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

(हेही वाचा – Madhya Pradesh Assembly Elections : मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक: भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि खासदार मैदानात)

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोमवार, २५ सप्टेंबर रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून मूडीजचा दावा निराधार असल्याचे म्हटले आहे. कोणताही पुरावा नसताना हा अहवाल तयार करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. भारतातील १०० कोटींहून अधिक लोकांचा त्यावर विश्वास आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.