केंद्राकडून मुंबई महापालिकेचा गौरव: नाविन्यपूर्ण सर्वोत्तम पध्दतीबाबतचा प्रथम पुरस्कार

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास खात्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१चे निकाल  २० नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले आहे.

84

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१चे पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये मुंबई महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण तसेच सर्वोत्तम पध्दतीबाबतचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. केंद्राच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे आणि परिमंडळ सातच्या उपायुक्त भाग्यश्री कापसे तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे प्रमुख अभियंता अशोक यमगर आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास खात्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१चे निकाल  २० नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मोठ्या शहरातील अर्थात ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत घनकचरा व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण आणि सर्वोत्तम पध्दतीचा वापर केल्याबद्दल मुंबई महापालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडले. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

BMC 6

मुंबई महापालिकेने ९ हजार मेट्रीक टनावरून कचऱ्याचे प्रमाणे ५५०० मेट्रीक टनावर आणले आहे, तसेच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, भूमिगत कचरा पेट्या, घरोघरी जावून कचरा गोळा करण्याच्या प्रमाणात वाढ तसेच कांजूरमार्ग येथी कचऱ्यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या नाविन्यपूर्ण तसेच आधुनिक पध्दतीचा वापर केला जात असल्याने या पुरस्कारासाठी मुंबई महापालिकेला पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.