ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढत्या महागाईने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांतही बाजारात तेजी दिसत नाही. यामुळेच आता केंद्र सरकारने सर्वसामांन्यांना मोठा दिलासा आहे. नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने डाळी आणि कांद्याच्या दरांत घट करणार असल्याची घोषणा केली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
डाळींच्या किंमतीत कपात
राज्यांना अत्यंत कमी दरात डाळी उपलब्ध करुन देणार असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. डाळींच्या दरांमध्ये किलोमागे 8 रुपये कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच सरकारने कांद्याचे भाव कमी करण्याचा निर्णयही घेतला आहे. कांद्याची कमतरता भासू नये म्हणून सरकारकडून बफर स्टॉकच्या माध्यमातून कांद्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत कांद्याचे भाव वाढण्यापासून अटकाव होणार आहे.
शेतक-यांना फायदा
आतापर्यंत केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना 88 हजार टन डाळ उपलब्ध करुन दिली आहे. डाळींची मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर डाळ आयात देखील करण्यात येते. तसेच डाळींच्या एसएसपीमध्ये देखील केंद्र सरकारने वाढ केल्यामुळे शेतक-यांनाही त्याचा फायदा होणार असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community