पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करणार; CM Devendra Fadnavis यांचे आश्वासन

47
पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करणार; CM Devendra Fadnavis यांचे आश्वासन
  • प्रतिनिधी

मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युद्धात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पानिपत येथे बोलताना दिले. पानिपत युद्धाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पानिपत येथील काला आम परिसरात मंगळवारी मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत १९ वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार राजाभाऊ वाझे आणि हर‍ियाणा शासनाचे अधिकारी, स्थानिक नागर‍िक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(हेही वाचा – समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे शालेय शिक्षण मंत्री Dada Bhuse यांचे निर्देश )

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, या युद्ध मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले. त्यानंतर झालेल्या अनेक मोहिमा मराठ्यांनी जिकंल्याच नाही तर अटकेपर्यंत झेंडा फडकविला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडे देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळ्यांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तख्त मराठ्यांनी एका काळी राखले. ही एकीची शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया असेही ते म्हणाले. या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे नमूद करुन या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली. यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – बोरिवलीतील Comprehensive Thalassemia Care Centre मध्ये कर्करोग आजारांच्या १३३१ बालकांवर उपचार)

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनीही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. याप्रसंगी समितीच्यावतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्यस्मारक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार, मराठा सेवा संघ, हरियाणा समस्त धाणक मराठा समाज, धनुष्यधारी धानक समाज, मराठा उत्थान समिती, मुदगल चेतना परिवार चेरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेयर संघ, पानीपत सार्वजानिक मराठा गणेश मंडल, यांनी प्रयत्न केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.