
-
प्रतिनिधी
पीओपी मूर्तींबाबत सरकार सकारात्मक असून डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर न्यायालयात विनंती याचिका दाखल करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत दिली.
(हेही वाचा – एसटीच्या भाडेतत्त्वावरील बसमध्ये १७०० कोटींचा घोटाळा, महिनाभरात कारवाई; CM Devendra Fadnavis यांची ग्वाही)
प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण विभागाने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. परिणामी १३ हजार मूर्तिकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पीओपी घातक आहे. याप्रकरणी पर्यावरण मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या भूमिका या परस्पर विरोधी आहेत. परंतु, गणेश भक्तांच्या भावना तीव्र आहेत असून त्यांचा रोजगार महत्त्वाचा आहे. त्यामुळे अभ्यास समिती गठीत करून ते सिद्ध होईपर्यंत कारवाई करू नये, अशी विनंती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थनग प्रस्तावाद्वारे परिषदेत मांडला. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Malhar Certificate : झटका मटणासाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’च्या घोषणेला जेजुरी देवस्थानाचा पाठिंबा)
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राज्यात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने हीच भूमिका घेतली आहे. पीओपीवर बंदी घालण्याची भूमिका ही सरकारने नव्हे तर प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घातली आहे. परंतु, सकारात्मक विचार व्हावा या दृष्टीने डॉ. काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. तांत्रिक मुद्दा असला तरी प्रदूषण कमी करण्यासंदर्भात विचार व्हावा, याबाबत समितीचा अहवाल आल्यावर त्यावर विचार केला जाईल. तसेच पर्यावरण विभागाकडे मुदत मागितली जाईल. न्यायालयात देखील विनंती याचिका दाखल करू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community