दुर्गराज रायगडावर जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या श्री राजाभिषेक शकाच्या तिथीनुसार श्री शिवराजाभिषेक सोहळ्याला (Shri Shivrajyabhishek Sohala) शासकीय मान्यता मिळावी, यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या माध्यमातून मागील ३० वर्षे प्रयत्न सुरु होते. अखेर त्याला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. ही श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या कार्याची पोचपावतीच आहे, असे श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी म्हटले आहे.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या काही मोजक्याच निष्ठावंतांनी शिवप्ररणेने हा लोकोत्सव (Shri Shivrajyabhishek Sohala) सुरु केला होता. हा उत्सव शासकीय पातळीवर साजरा करण्यात यावा, ही या शिवकार्यात वाहुन निःस्वार्थपणे तीन दशके शिवकार्य करणाऱ्या मावळ्यांची धडपड सुरु होती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विशेष करून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्यामुळे हे शक्य झाले, त्याबद्दल श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो, असे सुनील पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community