आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा! LPG सिलिंडरच्या दरात कपात, नवे दर जाणून घ्या…

102

केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 92 रुपयांची घट केली आहे. तर, घरगुती 14.2 किलो ग्रॅम सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच रक्कम द्यावी लागणार आहे.

( हेही वाचा : रविवारी बाहेर जाताय? मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पहा संपूर्ण वेळापत्रक)

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती जैसे थे 

गेल्या महिन्यात व्यवसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑइलने व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये 92 रुपयांनी घट करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये आता 19 किलो एलपीजी व्यवसायिक सिलेंडर 2 हजार 28 रुपयांना मिळणार आहे. तसेच कोलकातामध्ये 2 हजार 132, मुंबईत 1 हजार 980 आणि चेन्नईमध्ये 2 हजार 192 रुपये इतकी किंमत असेल. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1003 रुपये आहे. तसेच कोलकातामध्ये 1129 रुपयांना घरगुती सिलिंडर उपलब्ध असेल. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1102 रुपये असून, चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1119 रुपये मोजावे लागतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.