दिलासादायक! खाद्यतेलाच्या किंमती 15 रुपयांनी कमी होणार

80

खाद्य तेलाच्या किरकोळ किंमतीत 15 रुपये प्रती लिटर कपात केली जावी असे निर्देश सर्व खाद्यतेल संघटनांना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने शुक्रवारी दिली. तसेच उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना दिलेली किंमत देखील ताबडतोब कमी करण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.

खाद्यतेल संघटनांना निर्देश 

देशातील तेल उत्पादकांकडून जेव्हा जेव्हा वितरकांसाठी किंमती कमी केल्या जातात तेव्हा त्याचा फायदा उद्योगांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि विभागाला नियमितपणे माहिती दिली जावी, यावरही विचार करण्यात आला. काही कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि त्यांची एमआरपी इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे त्यांनाही त्यांच्या किमती कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खाद्य तेल संघटनांसोबत झालेल्या बैठकीत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने हे निर्देश दिले आहेत.

( हेही वाचा : Career Choice : दहावीनंतर पुढे काय? देशातील विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखांकडे जाणून घ्या! )

मे 2022 मध्ये खाद्य तेल संघटनांसोबत बैठक बोलावली. या बैठकीनंतर अनेक लोकप्रिय खाद्यतेलाच्या ब्रँडच्या किमती कमी करण्यात आल्या. सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे ते स्वस्त झाले आहेत. कमी शुल्काचा संपूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.